वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी ब्रेकअपचा असू शकतो. कारण या रिलेशनशिपने तुम्हाला अलीकडच्या काळात खूप निराश केलं आहे. तुम्ही दोघांनी तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे आणि वेळोवेळी व्यक्त केल्या तर हा ब्रेकअप टाळता येऊ शकतो. संवादाच्या शक्तीला कमी लेखू नका. संवाद तुम्हाला बरेच त्रास आणि समस्यांपासून वाचवू शकतो.
मिथुन : जोडीदाराशी ब्रेकअपचे संकेत आहेत. काही काळ ही रिलेशनशिप चांगली चाललेली नाही. ब्रेकअपची कारणं खूप क्षुल्लक असू शकतात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम माणूस गमावू शकता. त्यामुळे दोनदा विचार करा. निर्णयप्रक्रियेत तार्किक व्हा, शांत राहा. त्यामुळे योग्य मार्ग निवडता येईल.
advertisement
कर्क : रिलेशनशिपमध्ये असलेल्यांना काही अडचणी येतील आणि पार्टनरबद्दल काही गैरसमज होऊ शकतात. या किरकोळ गोष्टी असू शकतात; पण यामुळे तुमच्या दोघांमधल्या ऊर्जेत काही अडथळे निर्माण झाले आहेत. तुमच्या रिलेशनशिपच्या काही भागांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. संवाद साधण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावं लागेल.
नशिबाची साथ! फेब्रुवारी महिना या राशींना निराश नाही करणार; सहज प्रयत्नांना यश
सिंह : आपल्या नात्याकडे पाहा. ते तुमच्यासाठी खरंच हेल्दी आहे, याची खात्री करा. तुम्ही कोणाला जोडीदार म्हणून निवडता, याबद्दल काळजी घ्या. कारण चुकीच्या व्यक्ती निवडण्याच्या जुन्या सवयीत तुम्हाला परत जायचं नाहीये. तुमच्या आनंदासाठी दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्तीची निवड करण्याची शक्यता वाढेल. सुरुवातीला आकर्षक दिसतात; पण तुमच्याशी चांगलं वागत नाहीत, अशा व्यक्तींपासून दूर राहा.
कन्या : रिलेशनशिपमध्ये काही तणाव दिसू लागले आहेत. संवादाची कमतरता आणि काही अनावश्यक वादांमुळे अलीकडे तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये अंतर पडतं आहे. आज एकमेकांशी पुन्हा बंध दृढ करण्यासाठी वेळ घ्या. रिलेशनशिप पूर्वपदावर येईल आणि शांतता मिळेल. त्यामुळे आनंदी व्हाल.
तूळ : तुमच्या रिलेशनशिपमधले काही अडचणी दूर करण्यासाठी आज हेल्दी दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही आणि दुसऱ्या व्यक्तीही नेहमी पर्फेक्ट असू शकत नाहीत. आज संयम राखा आणि कोणाच्याही मोहात पडू नका. जेव्हा आपण संभाव्य जोडीदाराला भेटतो, तेव्हा आपण सर्वोत्तमच असतो. दीर्घकालीन आनंदाचा पाठपुरावा करावा लागतो.
घरावरील अमंगळ दूर! मौनी अमावस्येला या मंत्राचं पठण शुभ; पितृ आशीर्वाद
वृश्चिक : कपल्सना आज एकमेकांसोबत शांत वाटत असल्याची आणि स्थैर्य मिळाल्याची जाणीव होईल. रिलेशनशिपच्या सद्यस्थितीवर ते समाधानी असतील. या सुखाच्या दिवसांचा आनंद घ्या. कारण तुम्ही ते मिळवण्यासाठी कष्ट घेतले आहेत. चित्रपट पाहा किंवा पार्कमध्ये रोमँटिक वॉक घेऊन विशेष पद्धतीने वेळ व्यतीत करा.
धनू : रोमँटिक दृष्टिकोनातून आज अडचणी दूर होऊन अपेक्षित मार्गावर तुम्ही जात असल्याचं दिसेल. कुटुंबीय तुमचं ऐकतील. तुमची प्रिय व्यक्ती तुमची किती काळजी करते हे दाखवील. या काळाचा आनंद घ्या. चांगला संवाद आणि विश्वास कायम राखा.
मकर : आज रिलेशनशिपमधल्या संवादकौशल्यांवर काम करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला काय हवं आहे, ते जोडीदाराला सांगण्याच्या संकोचामुळे काही छोट्या समस्या उद्भवू शकतात. भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यात, तर समस्या टाळता येऊ शकतात. संवादानंतर तुमच्या नात्याला पुन्हा वेग मिळेल. तुम्ही मोकळेपणाने बोललात, म्हणून तुम्हाला आनंद होईल.
कुंभ : आज जोडीदाराच्या प्रेमाची ऊब अनुभवू शकता. कारण तुमच्यात सुसंवाद आणि खूप प्रेम आहे. प्रिय व्यक्तीशी तुमच्या भावना शेअर करा. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की हे प्रेम तुमच्यातदेखील दिसत आहे. आज थोडं रोमँटिक व्हा. तुमच्या पार्टनरला तुमची कोमल बाजू पाहायला आवडेल.
मासिक राशीभविष्य! फेब्रुवारी महिना कोणासाठी कसा? या राशींच्या भोवती पॉवर, पैसा
मीन : आज कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची आणि प्रेमाला एक संधी देण्याची तुम्हाला घाई होईल. सर्वसामान्यपणे अशा परिस्थितीत स्वतःला जाऊ देण्याची तुमची इच्छा नसते; मात्र आज तुम्ही एक प्रयत्न करण्यास तयार आहात. मोठ्या जोखमी मोठे फायदे देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. यामुळे तुमच्या रोमँटिक पॉसिबिलिटीज आणखी इंटरेस्टिंग होऊ शकतात.
