मुंबई आणि महाराष्ट्रातील वेळ - भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल आणि त्याचा मोक्ष म्हणजेच समाप्ती संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी होईल. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात चंद्रोदय साधारणपणे संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास होईल. याचा अर्थ असा की जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा तो आधीच ग्रहणाच्या स्थितीत असेल, ज्याला 'ग्रस्तोदित चंद्रग्रहण' असे म्हटले जाते. अवघ्या 20 ते 22 मिनिटांसाठी हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येईल.
advertisement
सूतक काळातील नियम -
हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने याचा वेध किंवा सूतक काळ पाळणे शास्त्राप्रमाणे आवश्यक मानले जाते. चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या साधारण 9 तास आधी सुरू होतो. आज सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासूनच सूतक सुरू झाले आहे. या काळात देवदर्शन, पूजा-पाठ किंवा कोणतेही शुभ कार्य करणे वर्जित मानले जाते.
होळी-धूलिवंदन का साजरं करायचं? ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितलं..
काय करावे आणि काय टाळावे?
धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, सूतक काळात काही महत्त्वाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो. सूतक काळात जेवण बनवणे आणि जेवणे निषिद्ध मानले जाते. आजारी व्यक्ती, वृद्ध आणि लहान मुले वगळता निरोगी व्यक्तींनी पाणी, ज्यूस किंवा दुधाचे सेवन टाळावे, असे सुचवले जाते. सूतक काळात स्नान करू नये, असे मानले जाते. तसेच या काळात झोपणे देखील टाळावे. ग्रहणाच्या काळात ईश्वराचे नामस्मरण करणे अत्यंत फलदायी ठरते. ग्रहण सुटल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनंतर संपूर्ण घराची स्वच्छता करून, अंघोळ करून मगच नवीन अन्नाचे ग्रहण करावे.
धूलिवंदनच्या संध्याकाळी लागणारं चंद्रग्रहण 3 राशींना त्रासाचे; सूतक काळ लागताच..
खगोलप्रेमींसाठी पर्वणी
सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होणारे हे ग्रहण खगोलप्रेमींसाठी एक मोठी घटना आहे. विशेषतः मुंबईच्या समुद्रकिनारी चंद्रोदयाच्या वेळी लालसर रंगाचा चंद्र पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
