TRENDING:

Chaturmas: चातुर्मासात लग्न-गृहप्रवेश केल्यास काय होतं? आषाढी एकादशीपासून सगळी शुभ कार्ये थांबणार

Last Updated:

Chaturmas 2025: चातुर्मास हा आषाढ शुद्ध एकादशीपासून (देवशयनी एकादशी) सुरू होऊन कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत (देवउठनी एकादशी/प्रबोधिनी एकादशी) चालणारा चार महिन्यांचा पवित्र काळ आहे. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : हिंदू धर्मात चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. या साधारण चार महिन्यांच्या काळात लग्न, गृहप्रवेश, जावळ, नामकरण समारंभ किंवा कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात अशी शुभ कामे केली जात नाहीत. ज्योतिषी अंशुल त्रिपाठी सांगतात की चातुर्मासाच्या या चार महिन्यांत विष्णूदेव योगनिद्रेमध्ये राहतात. विष्णू देव निद्रीत असताना मंगल कार्यांना त्यांचे तितके शुभ आशीर्वाद मिळत नाहीत, चातुर्मास हा आषाढ शुद्ध एकादशीपासून (देवशयनी एकादशी) सुरू होऊन कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत (देवउठनी एकादशी/प्रबोधिनी एकादशी) चालणारा चार महिन्यांचा पवित्र काळ आहे. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे हा काळ धार्मिक आचरण, जप-तप, आणि आत्मचिंतनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषी अंशुल त्रिपाठी याबद्दल सविस्तरपणे सांगत आहेत.
News18
News18
advertisement

चातुर्मासाच्या सुरुवातीला आपल्या क्षमतेनुसार एक किंवा अधिक नियम (व्रत) पाळण्याचा संकल्प केला जातो. हे नियम वैयक्तिक आवडीनुसार आणि आरोग्यानुसार निवडता येतात. उदाहरणार्थ: दिवसातून फक्त एकदाच भोजन करणे. चार महिने एकाच प्रकारचे धान्य खाणे (उदा. फक्त गहू किंवा फक्त तांदूळ). फक्त फळे खाणे. विशिष्ट दिवशी किंवा ठराविक काळासाठी मौन पाळणे. अनावश्यक प्रवास टाळणे किंवा काही अंतर पायी चालणे. काही लोक या काळात केस आणि दाढी न कापण्याचा संकल्प करतात.

advertisement

धार्मिक कार्ये आणि उपासना:

भगवान विष्णू आणि शिव शंकराची नियमित पूजा करावी. (विष्णू निद्रेत असल्याने शंकर सृष्टीचा कारभार सांभाळतात असे मानले जाते.) विष्णू मंत्र (उदा. ॐ नमो भगवते वासुदेवाय) किंवा शिव मंत्र (ॐ नमः शिवाय) चा जप करावा. भगवद्गीता, रामायण, श्रीमद्भागवत पुराण, शिवपुराण, विष्णू सहस्रनाम यांसारख्या पवित्र ग्रंथांचे पठण किंवा श्रवण करावे. आत्मचिंतन आणि मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगाभ्यास करावा. संध्याकाळी देवांची आरती करावी आणि भजन-कीर्तन करावे.

advertisement

या काळात दानधर्म करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गरीब आणि गरजूंना अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तूंचे दान करावे. ब्राह्मणांना भोजन देणे किंवा अन्नदान करणे शुभ मानले जाते. चातुर्मासात सात्विक आहार घेण्यावर भर दिला जातो. हलके, पचायला सोपे आणि शुद्ध अन्न खावे. ताजे शिजवलेले अन्न खावे आणि शिळे अन्न टाळावे. शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्यावर भर दिला जातो. नियमित स्नान करावे. घराची आणि परिसराची स्वच्छता राखावी.

advertisement

जुलैमध्ये पापी ग्रह केतुच्या स्थितीत बदल! 3 राशींचे अनपेक्षित चमकणार नशीब

चातुर्मासात काय करू नये?

चातुर्मासात काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आरोग्याची काळजी घेतली जाते.मांसाहार आणि तामसिक भोजन म्हणजे मांसाहार, अंडी आणि मासे पूर्णपणे टाळावे. कांदा आणि लसूण यांसारखे तामसिक मानले जाणारे पदार्थ काही लोक खाणे टाळतात. मुळा, वांगी, आणि इतर कंदमुळे (जमिनीत उगवणारे) तसेच पान, सुपारी, मद्यपान आणि तंबाखू यांचे सेवन टाळावे असे काही नियम सांगतात. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते आणि या पदार्थांमुळे अपचन किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

advertisement

शुभ आणि मांगलिक कार्ये:

चातुर्मास काळात विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा, उपनयन संस्कार (मुंज) यांसारखी कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत, कारण भगवान विष्णू या काळात निद्रेत असतात असे मानले जाते. या काळात अनावश्यक प्रवास करणे टाळावे असे मानले जाते. विशेषतः तीर्थयात्रा सोडून इतर लांबचे प्रवास टाळले जातात. पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती खराब असते आणि प्रवासात अडचणी येऊ शकतात. काही ठिकाणी चातुर्मासात भूमीवर झोपण्याचा नियम पाळला जातो, पलंग किंवा गादीचा वापर टाळला जातो. हे तपस्येचे प्रतीक मानले जाते. कोणाचीही निंदा करणे, खोटे बोलणे, भांडणे करणे, रागवणे आणि कोणत्याही प्रकारे नकारात्मक भावनांना प्रोत्साहन देणे टाळावे.

आषाढी एकादशीच्या उपवासामध्ये नेमकं काय खावंं? अनेकांकडून कोणत्या चुका होतात पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Chaturmas: चातुर्मासात लग्न-गृहप्रवेश केल्यास काय होतं? आषाढी एकादशीपासून सगळी शुभ कार्ये थांबणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल