लक्ष्मी देवीचा फोटो - आपल्या घरात नेहमी सुख आणि समृद्धी हवी असेल, तर शुक्रवारी बाजारातून कमळाच्या फुलावर बसलेल्या देवी लक्ष्मीचा एक फोटो खरेदी करा. हा फोटो देव्हाऱ्यात लावा. यानंतर, विधीनुसार देवीची पूजा करावी.
एक रुपयाचे नाणे - सुख-समृद्धीसाठी शुक्रवारी एक रुपयाचे नाणे देव्हाऱ्यात देवी लक्ष्मीसमोर ठेवावी. नंतर देवी लक्ष्मीची आणि त्या नाण्याचीही पूजा करा. हे नाणे एक दिवस देव्हाऱ्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते लाल कापडात बांधून तुमच्याकडे ठेवा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.
advertisement
आरोग्यासाठी शंख अर्पण करा - चांगल्या आरोग्यासाठी, शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात शंख अर्पण करावा. शंख अर्पण केल्यानं आरोग्य सुधारतेच असे नाही तर शरीरात नवीन ऊर्जा देखील निर्माण होते. यासोबतच, देवी लक्ष्मीला खीर अर्पण केल्याने आरोग्य, जीवनात आनंद आणि शांती देखील मिळते.
लकी अंक भाग्य उजळतात! मोबाईल, गाडी नंबरमध्ये जन्मतारखेनुसार असे नंबर जास्त यावेत
मातीच्या भांड्यात तांदूळ आणि नाणे - संपत्ती वृद्धीसाठी शुक्रवारी एक लहान मातीचे भांडे घ्या आणि त्यात तांदूळ भरा. नंतर त्या तांदळावर एक रुपयाचे नाणे आणि हळद घाला. हा कलश झाकणाने बंद करा आणि एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवा. त्यानंतर हा कलश पुजाऱ्याला दान करा. असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करते आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.
व्यवसायात नफा मिळविण्यासाठी मंत्रांचा जप -
व्यवसायात यश आणि नफा हवा असेल तर शुक्रवारी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि आसनावर बसून देवी लक्ष्मीचा मंत्र जप करा. मंत्र असा आहे - ‘ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. असे केल्याने व्यवसायात नफा मिळतो आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात, असे मानले जाते.
उत्पन्नात अद्याप घाटा! या मूलांकांना स्मार्ट नियोजन तारेल, शुक्रवारचं अंकशास्त्र
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)