TRENDING:

नशिबाचे चक्र फिरणार! मौनी अमावस्येनंतर सुरू झालाय 'या' 5 राशींचा गोल्डन टाइम, महिन्याभरात होणार डबल फायदा

Last Updated:

18 जानेवारी 2026 रोजी मौनी अमावस्या साजरी झाली. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यंदाची मौनी अमावस्या अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे, कारण शनीच्या मकर राशीत सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र या पाच ग्रहांची युती होऊन 'पंचग्रही राजयोग' निर्माण झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Astrology News : 18 जानेवारी 2026 रोजी मौनी अमावस्या साजरी झाली. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यंदाची मौनी अमावस्या अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे, कारण शनीच्या मकर राशीत सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र या पाच ग्रहांची युती होऊन 'पंचग्रही राजयोग' निर्माण झाला आहे. या महायोगामुळे अमावस्येनंतर आता 5 राशींच्या जातकांसाठी भाग्योदयाचा काळ सुरू झाला आहे. माघ महिन्यातील उर्वरित काळ या राशींसाठी 'डबल सरप्राईज' घेऊन येणार आहे, ज्यामध्ये आर्थिक लाभ आणि करिअरमधील मोठी प्रगती यांचा समावेश असेल.
News18
News18
advertisement

मेष :आत्मविश्वास आणि प्रगतीचे योग

मौनी अमावस्येनंतर मेष राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. करिअरमध्ये तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो, ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होतात. आर्थिक आघाडीवर अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि मान-सन्मान वाढेल.

मिथुन: करिअर आणि प्रवासात लाभ

advertisement

मिथुन राशीसाठी माघ महिना यशाची दारे उघडणारा ठरेल. बुध आणि मंगळाच्या युतीचा तुम्हाला मोठा फायदा होईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला एखाद्या नामांकित कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल. प्रवासातून तुम्हाला मोठे व्यावसायिक फायदे होतील, जे तुमच्या प्रगतीसाठी पूरक ठरतील.

कन्या: सुख-सुविधांमध्ये वृद्धी

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ स्थिरता आणि आनंद घेऊन आला आहे. कौटुंबिक जीवनात दीर्घकाळ चाललेले वाद संपुष्टात येतील. घरातील वातावरण उत्साही राहील आणि नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग जुळून येतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

advertisement

मकर: साडेसातीचा प्रभाव कमी आणि सन्मान

तुमच्याच राशीत ग्रहांची युती असल्याने मौनी अमावस्येनंतर तुमचे नशीब पालटणार आहे. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा पाहायला मिळेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. जुन्या आव्हानांचा शेवट होऊन तुम्ही नव्या उत्साहाने कामाला लागाल.

advertisement

कुंभ: आर्थिक चणचण संपणार

कुंभ राशीच्या लोकांसाठी माघ महिना भाग्योदयाचा काळ आहे. शनी आणि बुधाच्या प्रभावामुळे तुम्हाला नशिबाची भक्कम साथ मिळेल. गेली कित्येक वर्षे सुरू असलेली आर्थिक ओढताण आता संपुष्टात येईल. तुमच्या कष्टाचे गोड फळ मिळण्याची वेळ आली आहे. आरोग्याशी संबंधित तक्रारी दूर होतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला असा काही नफा मिळेल की ज्यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित होईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
नशिबाचे चक्र फिरणार! मौनी अमावस्येनंतर सुरू झालाय 'या' 5 राशींचा गोल्डन टाइम, महिन्याभरात होणार डबल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल