श्रीमंत बनवणाऱ्या सह्या कशा असतात -
स्वाक्षरी ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्या सह्यांमध्ये चार प्रकारचे चिन्ह असतात ते भरपूर संपत्ती कमावतात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ज्यांच्या ज्यांच्या सही 'मनी माऊंटन' असतो त्यांना आर्थिक अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे, ज्यांच्या स्वाक्षरीमध्ये 'मनी बॅग' तयार होते ते देखील श्रीमंत असतात. याव्यतिरिक्त, ज्यांच्या स्वाक्षरीमध्ये पैशाचा त्रिकोण किंवा 'मनी बाऊल' असतो त्यांना देखील श्रीमंत मानले जाते. याविषयी जाणून घेऊ.
advertisement
मनी माऊंटन - ज्यांच्या सहीमध्ये मनी माऊंटन तयार होतो, त्यांच्या सहीमध्ये संपत्ती आकर्षित करण्याची क्षमता असते. सही करताना त्यात मनी माऊंटन नीट येत असल्याची खात्री करा. उदाहरणार्थ, जर तुमचे नाव M ने सुरू होत असेल किंवा त्यात M असेल, तर M अशा प्रकारे काढावे की ते डोंगरासारखे दिसेल.
मनी बॅग - सही करताना तुम्ही त्यात मनी बॅग तयार करण्याची सवय लावल्यास तुमच्याकडे नेहमीच पैशांचा प्रवाह स्थिर राहील. तुमचे पैसे निरुपयोगी गोष्टींवर खर्च होणार नाहीत. श्रीमंत लोकांच्या सहीत अनेकदा मनी बॅग पाहायला मिळते. उदाहरणार्थ, तुमच्या नावातील एक अक्षर Y, G, J, P, L, किंवा इतर कोणतेही अक्षर जे लिहिताना एक मोठं वळण घ्यावं लागतं. गोलाकार मनी बॅग तयार व्हायला पाहिजे. तुम्ही तुमच्या सहीमध्ये मनी बॅग तयार करून फायदा घेऊ शकता.
मनी बाऊल - ज्या लोकांच्या स्वाक्षरीमध्ये मनी बाऊल तयार होतो, त्यांच्याकडे भरपूर पैसा येतो, असे मानले जाते. संपत्ती जमा करण्यात हे लोक येशस्वी होतात. मनी बाऊल माणसाला श्रीमंत बनवतो.
पैशाचा त्रिकोण (धन त्रिकोण) - काही लोक सही करताना अक्षरे अशा प्रकारे लिहितात, त्यातून धन त्रिकोण तयार होतो. सहीत धन त्रिकोण तयार होणं म्हणजे तुमचे आर्थिक व्यवस्थापन उत्कृष्ट आहे. पैशांच्या आघाडीवर असे लोक भक्कम असतात; असे लोक आपल्या कार्यक्षम आर्थिक व्यवस्थापनाद्वारे यश मिळवतात.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
