नोव्हेंबर महिन्यातील ग्रहस्थितीतील मोठे बदल
पंचांगानुसार, २ नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल, तर २६ नोव्हेंबर रोजी तो वृश्चिक राशीत जाईल. त्याचबरोबर १० नोव्हेंबर रोजी बुध वक्री होईल आणि नंतर २३ नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करून २९ नोव्हेंबरला मार्गी होईल. ११ नोव्हेंबर रोजी गुरू ग्रह कर्क राशीत वक्री, तर २८ नोव्हेंबर रोजी राणी देव मार्गी होईल. याशिवाय, १६ नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या सर्व बदलांचा एकत्रित परिणाम तीन राशींवर विशेष स्वरूपात होईल.
advertisement
वृश्चिक राशी
नोव्हेंबर महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रगती देणारा ठरेल. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, अडकलेले प्रकल्प पुन्हा गती घेतील. आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी घडतील आणि घरगुती वातावरण आनंदी राहील. या काळात काहींना कौटुंबिक कार्यक्रम,सण, विवाह किंवा शुभ प्रसंगांचा आनंद मिळू शकतो.आरोग्य उत्तम राहील आणि तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल. एकंदरीत, हा महिना तुमच्या आत्मविश्वासाला नवा उजाळा देणारा ठरेल.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे. शुक्र आणि बुध दोन्ही तुमच्या राशीत लाभदायक स्थितीत असतील. त्यामुळे भाग्याची साथ मिळेल, प्रतिष्ठा वाढेल आणि सामाजिक वर्तुळात ओळख निर्माण होईल. या काळात नवीन करार, व्यवसायातील वाढ, नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ यांसारख्या संधी मिळू शकतात. नातेसंबंधात गोडवा येईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. काहींना नवीन कमाईचे मार्ग किंवा गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. एकंदरीत, नोव्हेंबर महिना तूळ राशीच्या लोकांसाठी नाव, मान आणि प्रतिष्ठा वाढवणारा काळ ठरू शकतो.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना सकारात्मक बदलांचा आणि प्रगतीचा काळ ठरेल. दीर्घकाळापासून केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळेल. करिअरमध्ये घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल, तर व्यवसायिकांसाठी हा मोठा धनलाभ आणि प्रगतीचा काळ ठरू शकतो. घरात शांतता आणि स्थिरता राहील. पालकांचा आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.काहींना प्रवासातून लाभ मिळू शकतो.मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असून,तुम्हाला आत्मविश्वास आणि मानसिक समाधान मिळेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
