TRENDING:

ही चूक करू नका, अन्यथा बसेल फटका!  7, 16 आणि 25 जन्म तारीख असणाऱ्यांना नवं वर्ष कसं असणार?

Last Updated:

Numerology: अंक ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याच्या जन्म तारखेवरून त्याचं भविष्य समजू शकतं. 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या म्हणजेच मूलांक 7 असणाऱ्यांना नवीन वर्ष कसं असणार जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर - एखादा अंक हा अंकशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करू शकतो. अंकशास्त्र हे प्रत्येक संख्येशी जोडलेल्या अर्थाभोवती फिरत असते. कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला ज्या व्यक्तींच्या जन्म झालेला असतो त्यांचा मुलांक किंवा शुभांक हा 7 असतो. अंकशास्त्राच्या या विशेष भागात आपण ज्यांचा मुलांक किंवा शुभांक 7 आहे, त्यांच्यासाठी येणारं नववर्ष कसं असेल? याबाबत कोल्हापुरातील ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलंय.

advertisement

7 मुलांक कोणाचा..?

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 व 25 या तारखांना झालेला असतो अशा सर्व व्यक्तींचा जन्म अंक किंवा मुलांक हा सात हा येतो. 7 हा अंक शास्त्रानुसार केतू किंवा नेपच्यूनशी संबंधित असल्याकारणाने थोडासा गुढ असलेला दिसतो. केतू आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह ज्योतिषशास्त्रानुसार किंवा अंकशास्त्रानुसार गुढ मानले जातात. त्यामुळे त्यांच्यातील गुढपणा या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात आलेला दिसून येतो. या व्यक्ती स्वतंत्र पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करीत असतात. यांच्यावर कोणी दबाव टाकलेले यांना फारसं आवडत नाही. त्याचा तो विरोध व्यक्त करत नाहीत, मात्र आपल्या मर्जीनुसार जगण्याचा प्रयत्न करीत असतात.

advertisement

Numerology: 3 जन्मतारखांवर चालते सुखकारक शुक्राची सत्ता, 2025 वर्षात प्रेमविवाह होण्याची शक्यता, पण...

नियम मोडायला आवडतं

7 मुलांक असणाऱ्यांकडे पैसा मिळवण्याची कला असते, मात्र तेवढाच उदारपणा देखील असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला पैशाची कडकी यांच्या आयुष्यात आलेली दिसते. दुसऱ्यांना पुढे होऊन सल्ला द्यायला यांना आवडते. पारंपरिक गोष्टींमधून यांना जगणे आवडत नाही. नियम मोडायला यांना बऱ्यापैकी आवडते, अध्यात्माबद्दल यांना आवड असते. मात्र चाकोरीबद्द अध्यात्म यांना आवडत नाही. कधी कधी सगळा संसार सोडून हिमालयात निघून जावं किंवा विरक्त व्हावं, अशी भावना यांच्यामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे बऱ्याच वेळा या व्यक्ती उदासीन असल्याचं दिसून येतं. जलाशयाच्या ठिकाणी फिरायला जायला यांना फार आवडतं. अधिक करून समुद्रकिनारी किंवा एकांत अशा नदीकिनारी यांना बसायला आवडते. आयुष्याबद्दल अचानक उदासीन होण्याच्या प्रवृत्तीमुळे यांची प्रगती चटकन होत नाही. हे लोक आपल्या प्रगतीबद्दल कायम चाचपडत असल्याची दिसून येतात.

advertisement

7 मुलांकासाठी नवीन वर्ष कसं?

आगामी वर्ष हे मंगळाचंच म्हणजे 9 अंकाचं आहे. 9 या अंकाचे 7 या अंकाशी फारसे मित्रत्वाचे संबंध नाहीत. त्यामुळे या लोकांनी आपल्या ज्या काही नवीन योजना असतील त्या जगासमोर जाहीर करू नयेत. आपले कितीही जवळचे मित्र असतील तरीही कामाव्यतिरिक्त त्यांना या योजनांबद्दल माहिती देऊ नका. अन्यथा आपल्या योजना बारगळल्या जातील. आपण ठरवलेल्या गोष्टी यावर्षी मार्गी लागाव्यात यासाठी आपण दत्त महाराजांची उपासना करणे आपणास लाभदायक ठरेल, असे ज्योतिषी सांगतात.

advertisement

Numerology: कोणालाही सल्ला देताना जरा जपून! 5,14 आणि 23 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींसाठी कसं असेल नवं वर्ष

कोणती उपासना कराल..?

9 या अंकाचे हे वर्ष असल्याकारणाने आपणास दत्त महाराजांसोबतच गणपती किंवा मारुतीची देखील उपासना केली तर ती अधिक फायदेशीर ठरेल. आपण थोडे ध्यान धारणे कडे लक्ष दिले तर आपल्यामधील आत्मविश्वास नक्कीच वाढेल. इम्पोर्ट एक्स्पोर्ट किंवा शेतीशी संबंधित, पाण्याशी संबंधित म्हणजे दुग्ध, मत्स्य किंवा कॉस्मेटिक गोष्टींच्या व्यवसायात प्रयत्न केल्यास चांगले यश मिळेल. बऱ्याच वेळा आपणास आपण आजारी असल्यासारखे वाटते ते आजारपणाचे शारीरिक कारणांपेक्षा आपलं मानसिक कारण जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपलं मन कसं आनंदी राहील प्रसन्न राहील याकडे आपण लक्ष द्यावे. कामाचा फार ताण घेऊन नये. विश्रांतीला महत्त्व द्या, तरुणपणी आपणास आपल्या आरोग्याबद्दल फारसे चिंता निर्माण होणार नाहीत. मात्र त्या वयोपरत्वे त्रासदायक ठरू शकतात.

(सूचना: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
ही चूक करू नका, अन्यथा बसेल फटका!  7, 16 आणि 25 जन्म तारीख असणाऱ्यांना नवं वर्ष कसं असणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल