4 मूलांक कोणाचा?
ज्या व्यक्तींची जन्मतारीख 4, 13, 22 आणि 31 ही असते अशा सर्व व्यक्तींचा जन्म अंक किंवा मुलांक हा 4 हा असतो. 4 या अंकावरती राहू किंवा हर्षल या ग्रहाचा प्रभाव आहे. हर्षल हा ग्रह चंचल असून राहू हा ग्रह भ्रम निर्माण करणारा आहे. त्यामुळे 4 या अंकाच्या व्यक्ती थोड्याशा चंचल स्वभावाच्या असलेल्या दिसून येतात. या व्यक्ती संवेदनशील असून भावुक अशा असतात. 2025 हे वर्ष मंगळाच्या अधिपत्याखालील असल्याकारणाने आपणास मंगळ आणि या 4 अंकाचा स्वामी यांचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. 4 या अंकाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना आर्थिक नियोजन फारसे जमत नाही. त्यामुळे आर्थिक आघाडी वरती यांना थोडीशी माघार घ्यावी लागते. या व्यक्ती संवेदनशील असल्याकारणाने बोलताना फारसा विचार करत नाहीत, असं ज्योतिषशास्त्री राहुल कदम सांगतात.
advertisement
यावर्षी काय काळजी घ्यावी?
4 मुलांक असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या बोलण्याचा विस्तार यात होऊन गैरसमज निर्माण होऊ शकतो. आपले बोलणे समोरचा व्यक्ती कोणत्या अर्थाने घेतो हे प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजे नाहीतर नात्यांमध्ये विसंवाद निर्माण होतील. या कारणाने 4 या अंकाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तींनी यावर्षी बोलताना काळजीपूर्वक बोलले पाहिजे. नाहीतर त्यांच्या बोलण्यातून राईचा पर्वत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आर्थिक आघाडी वरती जर विचार करायला गेलं तर 4 या अंकाने यावर्षी गुंतवणूक करत असताना फार विचारपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कारण केलेली गुंतवणूक ही अडकून राहू शकते किंवा त्यामध्ये नुकसान होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूक करीत असताना चारी बाजूने त्याचा विचार करावा. कुणाच्याही बोलण्यावरती भाळून जाऊन गुंतवणूक करू नये कारण आपल्या अंकावरती जो राहूचा प्रभाव आहे तो राहो तुम्हाला यावर्षी नुकसानीत आणू शकतो, असं ज्योतिषशास्त्री राहुल कदम सांगतात.
गुंतवणूक करताय? ही काळजी अवश्य घ्या
शेअर्स खरेदी करत असताना किंवा कुठलीही गुंतवणूक करत असताना सोन्याची असो किंवा जमिनीची असो ती गुंतवणूक तुमच्या अंगलट येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायातली गुंतवणूक असो किंवा एखाद्याला हात उचलून रक्कम देणे असो त्याबाबतीत काळजीही घेतलीच पाहिजे.
आरोग्य सांभाळा
आरोग्याचा विचार करता यावर्षी 4 या अंकाने आपल्या पोटाशी संबंधित काळजी घेणे फार गरजेचे आहे. पोटाशी संबंधित विकार निर्माण होऊन त्याचा त्रास उद्भवू शकतो त्याकरिता शिळे अन्न किंवा बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. मूत्राशयाशी संबंधित देखील विकार उद्भवू शकतात. त्यामुळे सार्वजनिक टॉयलेट वापरत असताना काळजी घ्यावी. युरीन इन्फेक्शन आणि फूड इन्फेक्शन होण्याचे चान्सेस या काळात जास्तीत जास्त राहतील जर आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली तर याचा त्रास होणार नाही.
कोणती उपासना कराल?
4 हा अंक राहूच्या अंमलाखाली असल्याकारणाने यावर्षी कालभैरवाची उपासना फायदेशीर ठरेल. तसेच नऊ हा अंक गणपती आणि मारुतीची उपासना दर्शवत असल्याकारणाने कालभैरवा सोबतच मारुती किंवा गणपतीची उपासना तुम्हाला ह्या वर्षी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदतशील ठरतील, असंही ज्योतिषशास्त्री राहुल कदम सांगतात.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.