शाहरूख खान, अमिताभ बच्चन यांच्यासारखे सुपरस्टार्स, तसंच खुशवंतसिंग यांच्यासारखे दिग्गज लेखक, आगा अली खान, तसंच राष्ट्रपिता महात्मा गांधी ही सारी 2 या अंकाची उत्तम उदाहरणं आहेत. 2 हा अंक चंद्राचं प्रतिनिधित्व करतो. सामाजित प्रतिष्ठा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व यांच्याशी नशिबाची सांगड घालण्याचं काम चंद्र करतो.
2 हा असा अंक आहे, की जो संबंधित व्यक्तीला लोकांशी भावनिकरीत्या जोडलं जाण्यास मदत करतो. त्यामुळे अशा व्यक्ती अत्यंत उत्तम अशा सार्वजनिक वक्त्या होतात.
advertisement
शुभ दिवस : सोमवार
आधिपत्य : 2 (चंद्र)
शुभ रंग : पांढरा, निळा
शुभ अंक : 2, 6
म्हातारा गेला, आता 'आसळकाच्या धारा'; वाहन म्हैस असल्यानं असा राहील पाऊसकाळ
सामर्थ्याची क्षेत्रं, क्षमता, गुणधर्म, यूएसपी : या व्यक्ती स्वयंशिस्त पाळणाऱ्या असतात. वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असतात. यांचं काम शिस्तबद्ध असतं. या व्यक्ती उत्साही असतात. तसंच, या व्यक्ती कमिटेड म्हणजेच कामाशी कटिबद्ध असतात. या व्यक्तींकडे उत्तम संवादकौशल्य असतं. 2 अंक असलेल्या व्यक्ती भावनाप्रधान असतात. तसंच, या व्यक्ती पूर्णतः लवचीकही असतात. या व्यक्ती निष्पाप/निरागस असतात. या व्यक्तींना अंतःप्रेरणेची साथ लाभते. या व्यक्ती दयाळू असतात आणि या व्यक्ती युनिव्हर्सल पार्टनर्स म्हणून ओळखल्या जातात. कारण त्यांचं कोणाशीही पटतं. या व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व आध्यात्मिकही असतं.
या क्षेत्रांमध्ये काळजी घेण्याची किंवा काम करण्याची गरज :
या व्यक्ती आत्मविश्वास गमावू शकतात. या व्यक्तींच्या निर्णयांवर भावनांचा परिणाम होतो. या व्यक्तींचे मूड्स बदलत राहतात आणि त्यात चढ-उतार होत राहतात. या व्यक्ती अत्यंत संवेदनशील असतात. दोन अंक असलेल्या व्यक्ती जजमेंटल असतात. त्या व्यक्तींना नातेसंबंधांत संघर्षांना तोंड द्यावं लागू शकतं. या व्यक्ती अती काळजी घेतात आणि चोखंदळ असतात.
या राशींवर शनीची असते विशेष कृपा; साडेसाती, महादशेतही शुभ गोष्टी घडून येतात
2 अंक असलेल्या व्यक्तींसाठी अनुकूल प्रोफेशन्स :
2 अंक असलेल्या व्यक्तींना अनुकूल ठरतील अशा प्रोफेशन्सची यादी देत आहोत.
दूध, द्रवपदार्थांशी संबंधित उद्योग, रसायनं, औषधं, कायदे अंमलबजावणी, क्रीडा, डिटेक्टिव्ह एजन्सी, डिस्ट्रिब्युटरशिप, पाणी, आइस्क्रीम्स, ऑइल रिफायनरी, पेट्रोल, इत्यादी.
दानधर्म :
- या व्यक्तींनी गायी किंवा आश्रमात दूध दान करावं.
- या व्यक्तींनी दर सोमवारी भगवान शिवशंकरांना साखर मिसळलेल्या दुधाचा अभिषेक करावा.
- या व्यक्तींनी छोट्या किंवा स्टार्टअप ब्रँडशी सहयोग करावा. स्वतःचं नाव ब्रँडप्रमाणे वापरावं.
- या व्यक्तींनी मोबाइल नंबरमधल्या सर्व अंकांची बेरीज 6 येईल असा नंबर निवडावा.
- चांद्रमंत्र पठण करावं. महत्त्वाचे निर्णय घेताना चंद्राच्या कलांचा विचार करावा.
- नॉन-व्हेज आहार, मद्यपान, तंबाखू खाणं टाळावं. प्राण्यांच्या चामड्याच्या वस्तू वापरू नयेत.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगती ठरलेली! पण, प्रेमात नसते इमोशनल अटॅचमेंट
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)