TRENDING:

Numerology: मकर संक्रातीला या मूलांकाला वाईट बातमी; कोणाचे तोंड गोड होणार, दैनिक अंकशास्त्र

Last Updated:

Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 14 जानेवारी 2026 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक) आज तुम्हाला भावंडांकडून अपेक्षेप्रमाणे मदत मिळणार नाही. मुलांशी संबंधित एखादी बातमी तुमच्या मनाला चटका लावून जाऊ शकते. विजेच्या उपकरणांचा वापर करताना आज विशेष काळजी घ्या. जुनी देणी किंवा कर्ज फेडण्यासाठी आजचा काळ चांगला आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस थोडा संथ असेल, पण लवकरच तुम्हाला तुमचा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक) तुमचा कल आज अध्यात्माकडे जास्त असेल. आज तुम्ही खूप मोकळ्या आणि आनंदी विचारात असाल. आपली महत्त्वाची कागदपत्रे किंवा वस्तू जपून ठेवा, काहीतरी हरवण्याची भीती आहे. आर्थिक व्यवहारातून आज चांगला फायदा होण्याची चिन्हे आहेत. आज तुमची भेट एखाद्या अशा व्यक्तीशी होईल जी तुम्हाला भारावून टाकेल.

advertisement

अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक) सरकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित तुमची कामे आज तांत्रिक कारणांमुळे रेंगाळू शकतात. तुम्हाला आज कविता किंवा साहित्यात रस वाटेल. तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे कामाच्या ठिकाणी सावध राहा. लग्नाचे निर्णय घेण्यासाठी किंवा तारीख ठरवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.

advertisement

अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक) घरातील वातावरण आज सुखद आणि शांत असेल. वेळेसोबत तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होत जातील. आज तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी वाटेल. प्रतिस्पर्ध्यावर मात केल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक कुठूनतरी धनलाभ होऊ शकतो. जोडीदाराशी संवाद साधताना आनंदी वातावरण राहील.

advertisement

सिंह वृषभसह 5 राशींना टेन्शन देणारी बातमी! स्ट्रेस, आर्थिक नुकसान, कष्ट पाण्यात

अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक) आज तुम्हाला कोणीतरी समजून घेत नाहीये किंवा तुम्ही एकटे आहात असे वाटू शकते. संगीत, कला आणि साहित्यात तुम्ही मन रमवाल. जमीन किंवा घराशी संबंधित व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल. जोडीदारासोबत आजची संध्याकाळ रोमँटिक आणि सुखद असेल.

advertisement

अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक) ऑफिसमध्ये वरिष्ठ सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत राहून वाद मिटवा. मुलांच्या शाळेतून एखादी चांगली बातमी मिळेल. प्रवासात किंवा बाहेर जाताना आपल्या सामानाची काळजी घ्या. सध्या तुमचे पूर्ण लक्ष पैसे कमवण्यावर आणि करिअरवर असेल. जोडीदारासोबत थोडे तणावाचे संबंध राहतील, तिथे संयम ठेवा.

अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक) आज तुमची मैत्री एखाद्या अतिशय रंजक व्यक्तीशी होईल. आज तुमचे आकर्षण वाढेल आणि तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना धैर्याने कराल. व्यवसायात घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकतात. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक दृढ आणि विश्वासाचे बनेल.

अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक) आज भावंडांकडून तुम्हाला पूर्ण प्रेम आणि सहकार्य मिळेल. घरासाठी काही वस्तूंची खरेदी केल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. प्रकृती आज थोडी नरम-गरम असू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या. खूप प्रयत्नांनंतर आर्थिक लाभ होईल. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे.

खुश व्हा! मकर संक्रातीची पहिली गोड बातमी 3 राशीच्या लोकांना; सूर्य-शनिची कृपा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मकर संक्रांतीला ‘हे’ दान करा, भाग्य चमकेल, पण ‘ती’ चूक महागात पडेल, Video
सर्व पहा

अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक) आज तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो. लोकांशी मिळून केलेल्या कामातून तुम्हाला फायदा होईल. अपघाताची शक्यता असल्यामुळे वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना सावध राहा. सहकाऱ्यांकडून थोडा विरोध सहन करावा लागू शकतो. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: मकर संक्रातीला या मूलांकाला वाईट बातमी; कोणाचे तोंड गोड होणार, दैनिक अंकशास्त्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल