TRENDING:

Numerology: सोमवारचा दिवस या 3 मूलांकासाठी लाभाचा; गुंतवणूक नफा देणार, पहा संपूर्ण अंकशास्त्र

Last Updated:

Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

सोमवारचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. आज सगळी कामं नियोजन-हुशारीनं चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. वडिलांकडून सल्ला घेऊन आज काही काम केल्यास त्याचे खूप फायदे मिळतील. आज कौटुंबिक आनंद मिळेल. कुटुंबासाठी नवं घर घेण्याचा विचार कराल. मानसिकददृष्ट्या खूप आनंदी असाल. त्यामुळे आज कुटुंबीयांसमवेत कार्यक्रमाला जाऊ शकाल.

नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

आजचा सोमवार खूप चांगला असेल. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळतील. त्याचा तुम्हाला मनापासून आनंद होईल. अनेक अडचणींवर मात कराल. सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील. कौटुंबिक आनंद अनुभवाल. आज जोडीदार आणि कुटुंबीयांसमवेत आनंदात दिवस जाईल.

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

आजचा दिवस अनुकूल आहे. बुद्धिमत्ता आणि समज यांच्या आधारे आज सर्व कामं पूर्ण कराल. आज मनात खूप खोल आणि आध्यात्मिक विचार येतील. त्यामुळे भविष्यात चांगला निष्कर्ष काढू शकाल. आज काही शुभ गोष्टींविषयी कुटुंबीयांशी चर्चा करील. आगामी दिवसांत नियोजन कराल. त्यामुळे भविष्यात सुखद अनुभव मिळेल.

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

आजचा सोमवार आपल्यासाठी अडचणींचा असेल. कोणाही विषयी आज कठोर शब्दांचा वापर करू नका. त्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. आज ज्ञान आणि हुशारी यांच्यामध्ये भेद असतील. वर्तनात शांती ठेवा. मृदू शब्दांत बोलल्यास अधिक प्रभावी ठरेल. आज घरातल्या समस्यांसंदर्भात जोडीदाराशी वाद/चर्चा होईल. आज घरात शांतता राखावी लागेल. घरातल्या ज्येष्ठांची विशेष काळजी घ्या. आज नवं काम सुरू करणं टाळा.

advertisement

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सोमवारचा दिवस बरा आहे, कामांबद्दल विचार करणं आणि ती पूर्ण करणं यांमध्ये खूप फरक असेल. त्यामुळे कोणत्या निष्कर्षाप्रत येणं अवघड ठरेल. आज शांत राहावं लागेल. कोणतंही काम करण्यापूर्वी तुमची बुद्धी वापरा. काळजीपूर्वक विचार करूनच पुढे जा. बिझनेस किंवा जॉबमध्ये पुढे जाण्यासाठी नव्या संधी मिळतील. आज कौटुंबिकदृष्ट्या संमिश्र दिवस असेल. आज जोडीदारासाठी सर्वसाधारण दिवस असेल.

मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं चंचलतेचं कारण? प्रगती साधतात पण...

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज सोमवारचा दिवस चांगला असेल. कामांमध्ये काही अडचणी येतील. आज थोड्या संयमाने काम करा. आज नियोजित कामं पूर्ण होणार नाहीत. आज मुलांच्या आरोग्याबद्दल चिंता वाटेल; मात्र संयमाने काम केल्यास उपाय निघेल. आज कामाच्या पाठी धावावं लागेल. जोडीदाराशी बोलल्यानंतर काही निर्णय घेतल्यास फायद्याचं ठरेल. कुटुंबीयांसमवेत एकत्र राहिल्यास फायदे मिळतील.

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज सोमवारचा दिवस फारसा चांगला नाही. कामं नीट होणार नाहीत, कौटुंबिक समस्याही उद्भवतील. जोडीदाराशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज आरोग्याची काळजी घ्या. मधुमेह होण्याची शक्यता दिसते. काय खाता-पिता, यावर लक्ष ठेवा. गोड खाणं टाळा. आज पैसे अडकतील.

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस बरा नाही. आजचा दिवस समस्या आणि अडथळ्यांचा असेल. तरीही कष्टांची फळं मिळतील. आज नियोजित कामं पूर्ण होतील आणि समस्या काही प्रमाणात कमी होतील. आज आर्थिकदृष्ट्याही कष्ट घ्यावे लागतील. त्यानंतरच पैसे मिळतील. आज तुमचा दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नम्र शब्द वापरा. शांत राहा. कोणाशीही वाद घालू नका.

दसऱ्यापासून या 5 राशींचा गोल्डन टाईम येणार; करिअर-व्यवसायात मोठी उसळी, सुख

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस आपल्यासाठी बरा आहे. आज ट्रिपचाही प्लॅन करू शकाल. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. काही अडचण असल्यास मोठ्या भावाकडून सल्ला घ्या. कुटुंबातही आनंदाचं वातावरण असेल. आज जोडीदारावर रागावाल. जोडीदाराशी चांगलं वागा आणि नम्र भाषा वापरा.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: सोमवारचा दिवस या 3 मूलांकासाठी लाभाचा; गुंतवणूक नफा देणार, पहा संपूर्ण अंकशास्त्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल