मूलांक 1: सूर्यासारखे तेज आणि अधिकार
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1 असतो. या अंकाचा स्वामी 'सूर्य' आहे. मूलांक 1 चे लोक जन्मतःच नेतृत्व गुण घेऊन येतात. त्यांना कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही. ते सहसा उच्च सरकारी पदांवर किंवा मोठ्या व्यवसायाचे मालक असतात. सूर्याच्या कृपेने त्यांना समाजात प्रचंड मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळते.
advertisement
मूलांक 6: विलासी आणि ऐश्वर्यसंपन्न जीवन
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 6 असतो. या अंकाचा स्वामी 'शुक्र' आहे. शुक्र हा सुख-सोयी आणि सौंदर्याचा कारक आहे. या मूलांकाचे लोक अत्यंत विलासी जीवन जगतात. महागड्या गाड्या, मोठे घर आणि ब्रँडेड वस्तूंची त्यांना आवड असते. त्यांच्या कुंडलीत राजयोग असल्याने त्यांना आयुष्यात पैशांची कधीच कमतरता भासत नाही.
मूलांक 9: धाडस आणि विजय
कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. या अंकाचा स्वामी 'मंगळ' आहे. हे लोक अत्यंत धाडसी आणि शिस्तप्रिय असतात. ते ज्या क्षेत्रात जातात तिथे आपले वर्चस्व निर्माण करतात. कठीण परिश्रमानंतर ते अशा उंचीवर पोहोचतात जिथे ते राजासारखे जीवन जगतात. विशेषतः लष्कर, पोलीस किंवा मोठ्या प्रशासकीय सेवेत हे लोक चमकतात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
