कपाशीचे दर घसरले
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या अहवालानुसार, आज राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 126 क्विंटल आवक नोंदवण्यात आली. यामध्ये नागपूर बाजारात 92 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली. नागपूर बाजारात कपाशीला किमान 7,500 रुपये तर कमाल 8,100 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. शनिवारी नोंदवलेल्या उच्च दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात घट झाल्याचे चित्र आहे.
advertisement
कांद्याच्या दरातही नरमाई
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये कांद्याची एकूण आवक 64 हजार 459 क्विंटल इतकी झाली. यापैकी अहिल्यानगर बाजारात 35 हजार 815 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. या बाजारात कांद्याला किमान 200 ते कमाल 2,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. विशेष म्हणजे, अहिल्यानगर बाजारात आलेल्या 2,321 क्विंटल कांद्याला 2,100 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला. मात्र, शनिवारी मिळालेल्या उच्च दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे.
सोयाबीनचे दर घसरले
राज्यातील कृषी बाजारांमध्ये आज एकूण 557 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये नागपूर बाजारात 317 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक नोंदली गेली. नागपूर बाजारात सोयाबीनला किमान 3,400 रुपये तर जास्तीत जास्त 5,325 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या उच्च दराच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.
तुरीच्या दरात घट
आज राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये तुरीची एकूण 256 क्विंटल आवक झाली. यापैकी छत्रपती संभाजीनगर बाजारात 132 क्विंटल तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. या ठिकाणी तुरीला 6,401 ते 6,886 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर बुलढाणा बाजारात आलेल्या तुरीला सर्वाधिक 7,200 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. मात्र, शनिवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या उच्च दरात घट झाल्याचे दिसून येत आहे.





