Agriculture News : कांद्याने केले हाल, विक्रीतून लागवडी खर्चही नाही निघाला, शेतकरी हवालदिल

Last Updated:

एका एकरामध्ये कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवडीसाठी 45 हजार रुपयांपर्यंत खर्च केला होता. तर 22 पोते कांदा विक्रीतून 5 हजार रुपये मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

+
News18

News18

सोलापूर : अनेक महिन्यांपासून कांद्याचे भाव जसेच्या तसे आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा पीक म्हणजे खर्च जास्त आणि अल्प उत्पादन देणारे पीक सध्याच्या घडीला झाले आहे. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावात राहणाऱ्या रंगनाथ गावडे यांनी एका एकरामध्ये कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवडीसाठी 45 हजार रुपयांपर्यंत खर्च केला होता. तर 22 पोते कांदा विक्रीतून 5 हजार रुपये मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावात राहणाऱ्या रंगनाथ गावडे यांनी एका एकरामध्ये कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवडीला लागणारे बियाणे, औषध, फवारणी, खत असा मिळून जवळपास एका एकराला 50 हजार रुपयांचा खर्च रंगनाथ यांना आला होता. कांद्यावर रोग पडू नये म्हणून पोटच्या बाळाप्रमाणे कांद्याला जपले होते. परंतु ज्या वेळेस कांदा विक्रीसाठी बाजारात रंगनाथ यांनी घेऊन गेले, तेव्हा कांद्याच्या 22 पोत्याला 5 हजार रुपयांचा दर मिळाल्याने रंगनाथ गावडे हवालदिल झाले आहेत.
advertisement
गावडे यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हा कांदा विक्रीसाठी घेऊन गेले असता, चांगल्या कांद्याला 1200 रुपये क्विंटल दर मिळाला. 2 नंबर कांद्याला 600 रुपये क्विंटल दर मिळाला तर 3 नंबर कांद्याला 300 रुपये क्विंटलने दर मिळाला आहे. निर्यात बंदी उठून सुद्धा कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कांदा बाजारात घेऊन विक्री करावी की नागर फिरवावा? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबावे अशी आर्त हाक बळीराजा रंगनाथ गावडे यांनी केली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : कांद्याने केले हाल, विक्रीतून लागवडी खर्चही नाही निघाला, शेतकरी हवालदिल
Next Article
advertisement
PM Modi On BMC: २८४३ किमीवरून पीएम मोदींची बीएमसी विजयावर प्रतिक्रिया, ठाकरेंऐवजी कोणावर साधला निशाणा?
२८४३ किमीवरून पीएम मोदींची बीएमसी विजयावर प्रतिक्रिया, ठाकरेंऐवजी कोणावर साधला न
  • मुंबई महापालिकेत भाजप महायुतीने दमदार यश मिळवत बहुमत गाठले.

  • भाजपच्या यशावर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे.

  • मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेला भाजपला यश मिळाले असल्याचे त्यांनी म्हट

View All
advertisement