Mauni Amavasya 2026: वेगळं काहीच करता येत नसेल तर भर अमावस्येला घरबसल्या या गोष्टी करा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Upay Mantra : मौनी अमावस्येला आत्मशुद्धीसाठी आणि देवकृपेसाठी घरात बसल्या बसल्या काही मंत्राचा जप करता येईल. ईश्वरीय शक्ती प्राप्त करण्यासाठी आणि मनाच्या शुद्धीसाठी मौनी अमावस्येला घराच्या एकांत कोपऱ्यात बसून या मंत्रांचा जप करावा.
मुंबई : हिंदू धर्मात दर्श मौनी अमावस्या तिथी महत्त्वाची मानली जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, यामुळे पापांचा नाश होतो आणि पुण्य फळांची प्राप्ती होते. या दिवशी पूजा-पाठ आणि दानाचेही विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला एखाद्या पवित्र नदीवर जाणे शक्य नसेल, तर घरी राहूनही विशिष्ट मंत्रांच्या जपाने गंगा स्नानाइतकेच पुण्य मिळवता येते. ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात आज काही मंत्राचा जप करणं लकी ठरेल.
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु।
सर्वे समुद्रा सरितस तीर्थानी जलदानदा आयातु मम शांतम दुर्दक्ष कारका
हर हर गंगे
स्नान करताना या मंत्रांचा उच्चार केल्यास घरातील साध्या पाण्यालाही तीर्थाचे स्वरूप प्राप्त होते आणि सर्व पवित्र नद्यांचा आशीर्वाद मिळतो. सकाळी लवकर अंघोळ झाली असेल तरीही हातात शुद्ध पाणी घेऊन या मंत्राचा उच्चार करावा.
advertisement
मौनी अमावस्येला आत्मशुद्धीसाठी आणि देवकृपेसाठी घरात बसल्या बसल्या काही मंत्राचा जप करता येईल. ईश्वरीय शक्ती प्राप्त करण्यासाठी आणि मनाच्या शुद्धीसाठी मौनी अमावस्येला घराच्या एकांत कोपऱ्यात बसून या मंत्रांचा जप करावा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ सूर्याय नम: या ॐ घृणि सूर्याय नम:
ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्
advertisement
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्
ॐ भास्कराय विद्महे महातेजाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात" या "ॐ आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात
पितरांच्या आशीर्वादासाठी मंत्र
मौनी अमावस्या हा पितरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. जर तुम्हाला पितृ तर्पण किंवा पिंडदान करणे शक्य नसेल, तर खालील मंत्रांचा जप केल्याने पितृकृपा प्राप्त होते.
advertisement
ॐ पितृभ्य: नम:
ॐ श्री सर्व पितृ देवताभ्यो नमो नमः
ॐ पितृभ्यः स्वधायिभ्यः पितृगणाय च नमः
ॐ पितृगणाय विद्महे, जगत धारिणी धीमहि, तन्नो पितृ प्रचोदयात्
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 1:41 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mauni Amavasya 2026: वेगळं काहीच करता येत नसेल तर भर अमावस्येला घरबसल्या या गोष्टी करा








