सोयाबीनच्या दरात जोरदार उसळी! बाजार भाव कडाडणार? सध्याचे मार्केट काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soyabean market Update : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक होत असली तरी बाजारभावात संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक होत असली तरी बाजारभावात संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. काही बाजारांमध्ये दर स्थिर राहिले असून, काही ठिकाणी दर्जेदार मालाला चांगला भाव मिळत आहे. १७ जानेवारी २०२६ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यभरात सोयाबीनचे दर किमान ३,२०० रुपयांपासून ते कमाल ६,५०० रुपयांपर्यंत नोंदवले गेले आहेत.
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक समाधानकारक असल्याचे चित्र आहे. अमरावती बाजार समितीत सर्वाधिक ३,३७८ क्विंटल आवक झाली असून, येथे सोयाबीनला किमान ४,८०० तर कमाल ५,२२५ रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ५,०१२ रुपये राहिला. अकोला बाजारात ३,७३३ क्विंटल आवक झाली असून, येथे सरासरी दर ५,००० रुपये नोंदवण्यात आला आहे.
advertisement
वाशीम जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी दिसून आली. वाशीम बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला तब्बल ६,५०० रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला असून, सरासरी दर ६,००० रुपये राहिला. तसेच वाशीम- अनसींग बाजारातही ५,२५० रुपयांचा सरासरी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मराठवाड्यातील माजलगाव बाजार समितीत ९१७ क्विंटल आवक झाली असून, येथे सोयाबीनला किमान ४,००० तर कमाल ५,२०० रुपये दर मिळाला. लासलगाव- निफाड बाजारात पांढऱ्या सोयाबीनला ५,३८० रुपयांचा कमाल दर मिळाल्याने हा बाजार लक्षवेधी ठरला. मात्र, काही बाजारांत कमी प्रतीच्या मालामुळे दरावर दबाव असल्याचे दिसून आले.
advertisement
हिंगणघाट बाजारात मोठ्या प्रमाणावर १,४८८ क्विंटल आवक असूनही येथे सरासरी दर ४,००० रुपये इतका कमी राहिला. आर्वी, पुलगाव आणि वरूड या बाजारांतही किमान दर ३,५०० ते ३,९०० रुपयांपर्यंत घसरलेले दिसून आले. याचे प्रमुख कारण म्हणजे ओलसर व कमी दर्जाचा माल बाजारात आल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, कोपरगाव, सोलापूर, मेहकर, लोणार आणि अहमदपूर या बाजारांमध्ये सरासरी दर ५,१०० ते ५,३०० रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत. दर्जेदार, कोरडा आणि स्वच्छ मालाला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 1:37 PM IST








