पुण्यात कढीपत्त्यावरून राडा! 5-6 जणांच्या टोळक्याचं तरुणासोबत भररस्त्यात धक्कादायक कृत्य
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अक्षय यांच्या काकांनी आरोपी भाजी विक्रेत्याला कढीपत्त्याचे पाच बंडल देण्यास सांगितले होते. मात्र, आरोपीने अधिक सात बंडलची मागणी केली.
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात किरकोळ कारणावरून एका भाजी विक्रेत्याला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात केवळ कढीपत्त्याच्या बंडलवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. लोणी काळभोर पोलिसांनी पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वादाचे नेमके कारण काय?
याप्रकरणी अक्षय अशोक चव्हाण (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय हे थेऊर फाटा येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. अक्षय यांचे काका कढीपत्ता विक्रीचे काम करतात. घटनेच्या वेळी अक्षय यांच्या काकांनी आरोपी भाजी विक्रेत्याला कढीपत्त्याचे पाच बंडल देण्यास सांगितले होते. मात्र, आरोपीने अधिक सात बंडलची मागणी केली. याच किरकोळ कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.
advertisement
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर, आरोपी भाजी विक्रेत्याने आपल्या ५ ते ६ साथीदारांना बोलावून घेतले. या टोळक्याने अक्षय चव्हाण यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भररस्त्यात सुरू असलेल्या या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
पोलीस कारवाई: मारहाणीनंतर अक्षय चव्हाण यांनी तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. किरकोळ व्यावसायिक स्पर्धेतून किंवा रागातून अशा प्रकारे हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 7:37 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात कढीपत्त्यावरून राडा! 5-6 जणांच्या टोळक्याचं तरुणासोबत भररस्त्यात धक्कादायक कृत्य







