शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये का डांबलं? शिवसेनेच्या बड्या नेत्याचं वक्तव्य, म्हणाले, 'जिथे इंजिन चालतं..."
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबई महापालिकेत शिंदेंनी भाजपाला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये एकत्र ठेवलं आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपनं ८९ जागा जिंकल्या आहेत. तर इथं शिवसेना शिंदे गटाने २९ जागा जिंकल्या आहेत. मुंबईत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी स्वबळावर सत्ता स्थापन करणं शक्य नाही. त्यामुळे इथं एकनाथ शिंदे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मुंबईत भाजपचा महापौर होऊ शकत नाही. इथं शिंदेंनी भाजपाला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये एकत्र ठेवलं आहे.
शिंदेंनी आपल्याच निवडून आलेल्या नगरसेवकांना अशाप्रकारे हॉटेलात ठेवल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. नगरसेवक फुटू नयेत, यासाठी खबरदारी उपाय म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, मुंबईत भाजपचा महापौर होऊ नये, असं एकनाथ शिंदेंना देखील वाटतं, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात काय असतं, हे मला माहीत आहे, अशा आशयाचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. शिवाय संजय राऊत ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहेत, या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याबद्दल विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, "ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांच्या डोक्यात काय असतं, हे मला माहिती. जिथे इंजिन चालते तिकडे डब्बा चालतो. नेत्याच्या पुढे आम्हाला जाता येत नाही."
advertisement
ज्या हॉटेलमध्ये शिंदे सेनेच्या नगरसेवकांना ठेवलं आहे. त्याच हॉटेलमध्ये आम्ही जेवायला जाणार असल्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांनी त्या हॉटेलला जेवायला यावं, पण त्यांचं बिल त्यांनीच भरावं, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 1:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये का डांबलं? शिवसेनेच्या बड्या नेत्याचं वक्तव्य, म्हणाले, 'जिथे इंजिन चालतं..."








