आज 27 नोव्हेंबर 2025 रोजी पंचक सुरू होत असून ते 1 डिसेंबरपर्यंत असेल. या पाच दिवसांच्या काळात, काही कामे करणे अशुभ मानले जाते. कारण त्याचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. पंचक आजपासून सुरू होत असून पुढील पाच दिवसांमध्ये कोणते नियम आणि खबरदारी घ्यावी याविषयी जाणून घेऊया.
पंचक कधी लागतं?
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र जेव्हा धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्रांच्या तिसऱ्या टप्प्यातून जातो तेव्हा पंचक लागतं. 2025 या वर्षातील हे शेवटचे पंचक असणार आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पंचक -
सुरुवात: 27 नोव्हेंबर 2025, गुरुवार दुपारी 02:07 वाजता
समाप्ती: 1 डिसेंबर 2025, सोमवार रात्री 11:18 वाजता
चांदीच्या पायी चाललेला शनी 2026 मध्ये रंग दाखवेल! या राशींच्या जीवनावर प्रकाश
पंचक दोषमुक्त?
कोणत्याही पंचकाची शुभता त्याच्या सुरुवातीच्या दिवसावरून निश्चित केली जाते. श्री हरी विष्णू आणि गुरूला समर्पित असलेल्या गुरुवारच्या दिवशी पंचक सुरू होत असल्यानं ते अशुभ मानले जाते. या पंचकादरम्यान धार्मिक आणि शुभ कार्ये कोणत्याही अडचणींशिवाय करता येतात.
पंचकादरम्यान कोणती कामे टाळावीत?
जरी हे पंचक दोषमुक्त असले तरी, काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे टाळावे:
घराचा स्लॅब टाकण्याचे काम टाळावे.
खाट तयार करणे, दुरुस्ती बांधणी टाळावी.
दक्षिणे दिशेला प्रवास करणे टाळा.
लाकूड खरेदी करणे किंवा गोळा करणे.
अंत्यसंस्काराशी संबंधित नियमांकडे दुर्लक्ष करू नका.
पंचकादरम्यान काही गोष्टींची काळजी घेतल्यास संभाव्य धोके आणि अडचणी टाळण्यास मदत होते.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
