TRENDING:

Pitru Paksha 2025: नवमीच्या श्राद्धाला पितृपक्षात विशेष महत्त्व; महिलांसाठी खास संबंध, पहा धार्मिक महत्त्व-विधी

Last Updated:

Pitru Paksha 2025: पितृपक्षातील नवमी दिवशी श्राद्ध केल्याने मातृऋण फेडले जाते आणि पूर्वज महिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात. ज्या महिला आणि अविवाहित व्यक्तींचे श्राद्ध कोणीही करत नाही, त्यांच्या आत्म्यांना या श्राद्धाद्वारे शांती मिळते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नवमी श्राद्ध हे पितृपक्षात येणारे एक महत्त्वाचे श्राद्ध आहे. हे श्राद्ध अविवाहित मृत व्यक्ती (ज्यांचे लग्न झालेले नाही) आणि अविवाहित महिला (ज्यांचे लग्न झालेले नाही) यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. शिवाय ज्या महिला पती जिवंत असताना मयत झालेल्या असतात, त्यांचे श्राद्ध नवमीला केले जाते, याला आयोनवमी असंही बोलीभाषेत म्हटलं जातं. काही ठिकाणी या श्राद्धाला मातृनवमी असंही म्हणतात, कारण ते कुटुंबातील मृत माता, आजी आणि अन्य महिला पूर्वजांसाठी केले जाते. ज्या महिलांची मृत्यू तिथी माहीत नसते त्यांचेही श्राद्ध या तिथीला करणे अत्यंत शुभ मानले जाते.
News18
News18
advertisement

पितृपक्षात नवमी श्राद्धाचे महत्त्व -

पितृपक्षातील नवमी दिवशी श्राद्ध केल्याने मातृऋण फेडले जाते आणि पूर्वज महिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात. ज्या महिला आणि अविवाहित व्यक्तींचे श्राद्ध कोणीही करत नाही, त्यांच्या आत्म्यांना या श्राद्धाद्वारे शांती मिळते. नवमी श्राद्ध केल्यानं घरात सुख-शांती येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

नवमी श्राद्धाची पूजा आणि विधी -

advertisement

नवमी श्राद्ध विधी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.  श्राद्ध नेहमी दिवसा करावे. श्राद्ध करण्यासाठी घर किंवा पवित्र नदीचा किनारा निवडू शकता. श्राद्धासाठी आवश्यक साहित्य गोळा करा. यामध्ये काळे तीळ, जवस, तांदूळ, पाणी, पितृपक्षीय भोजन (पुरणपोळी, खीर, आणि सात्विक पदार्थ), आणि श्राद्धासाठी आवश्यक इतर वस्तूंचा समावेश असतो. श्राद्ध करण्यापूर्वी संकल्प करा. संकल्प म्हणजे श्राद्ध कोणत्या हेतूने करत आहात हे ठरवणे. यामध्ये तुम्ही ज्या पूर्वजांसाठी श्राद्ध करत आहात, त्यांचे नाव आणि गोत्र उच्चारू शकता. तर्पण करणेही महत्त्वाचे आहे. तर्पण करताना पितरांना पाणी आणि तीळ अर्पण केले जातात.

advertisement

घरात सतत अशा अडचणी म्हणजे पितृदोष! श्राद्धपक्षात पंचबली कर्म यासाठी करणं गरजेचं

श्राद्ध विधीमध्ये पिंडदान केलं जातं. पिंड हे तांदूळ आणि जवसापासून बनवले जाते. हे पिंड पितरांना अर्पण केले जातात. श्राद्धानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. हे भोजन सात्विक असावे. शक्य असल्यास, भोजन पुरणपोळी, खीर, आणि इतर आवडत्या पदार्थांचे बनवले जाते. नवमी श्राद्ध केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

advertisement

माहेर असो की सासर! नाकाजवळ इथं तीळ असलेल्या महिला पूर्ण कुटुंबाला श्रीमंत बनवतात

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Pitru Paksha 2025: नवमीच्या श्राद्धाला पितृपक्षात विशेष महत्त्व; महिलांसाठी खास संबंध, पहा धार्मिक महत्त्व-विधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल