पीठ मळल्यानंतर कणकेच्या गोळ्यावर बोटे उमटवण्याचे कारण धार्मिक आणि पारंपरिक समजुतींशी जोडलेले आहे. यामागे एक महत्त्वाचा अर्थ दडलेला आहे, जो आपल्या पूर्वजांशी आणि अन्नदानाशी संबंधित आहे.
धार्मिक आणि पारंपरिक कारण - असं करण्यामागं पिंडदानाची संकल्पना आहे. हिंदू धर्मात पिंडदान हा एक महत्त्वाचा विधी आहे. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तांदळाच्या पिठाचा गोल पिंड तयार करून तो अर्पण केला जातो. हा पिंड गोल असतो आणि त्यावर बोटांचे ठसे नसतात.
advertisement
पिंड आणि कणकेचा संबंध काय: जेव्हा आपण कणिक मळून त्याचा गोल गोळा बनवतो, तेव्हा तो दिसण्यात पिंडासारखा वाटू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार, अशा पिंडा सारख्या गोळ्यापासून चपात्या बनवून खाणे हे शुभ मानले जात नाही. हा दोष टाळण्यासाठी आणि ती कणिक 'पिंड' नाही, हे दर्शवण्यासाठी त्या कणकेच्या गोळ्यावर बोटांनी दाबून ठसे उमटवले जातात. यामुळे, त्या पिठापासून तयार केलेली पोळी किंवा चपाती खाण्यासाठी योग्य मानली जाते आणि असे केल्याने कोणताही दोष लागत नाही, अशी पारंपरिक धारणा आहे.
पिंडदानाचे महत्त्व -
पिंडदान हा एक पवित्र विधी आहे, त्याद्वारे पूर्वजांसाठी श्राद्ध केले जाते. यामध्ये तांदूळ, जवाचे पीठ, दूध, तीळ आणि मधापासून बनवलेले विशेष पिंड अर्पण केले जातात. पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष देण्यासाठी हा विधी केला जातो. पिंडदानाद्वारे, जिवंत व्यक्ती आपल्या पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करते. यामुळे पूर्वज तृप्त होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
माहेर असो की सासर! नाकाजवळ इथं तीळ असलेल्या महिला पूर्ण कुटुंबाला श्रीमंत बनवतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)