दशमी श्राद्ध म्हणजे काय?
दशमी श्राद्ध हे पितृ पक्षात येणाऱ्या दशमी तिथीला केले जाते. ज्या व्यक्तीचे निधन कोणत्याही महिन्याच्या शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील दशमी तिथीला झाले असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते. हे श्राद्ध त्याच दिवशी करावे, अशी हिंदू धर्मात परंपरा आहे. काही परिस्थितींमध्ये तिथीच माहीत नसेल तर सर्वपित्री अमावस्या त्यासाठी योग्य ठरेल.
advertisement
दशमी श्राद्ध अनुष्ठान दिनांक -
दशमी तिथी सुरुवात: 16 सप्टेंबर, पहाटे 1:31 वाजेपासून
दशमी तिथी समाप्ती: 17 सप्टेंबर, पहाटे 12:21 वाजेपर्यंत
कुतुप काळ मुहूर्त -
कुतुप मुहूर्त: आज दुपारी 12:09 ते दुपारी 12:58 वाजेपर्यंत
रोहिणी मुहूर्त: आज दुपारी 12:58 ते 1:47 वाजेपर्यंत
दुपार काळ: आज दुपारी 1:47 ते 4:13 वाजेपर्यंत
दशमी श्राद्धाचे महत्त्व - आज श्राद्धाच्या माध्यमातून पितरांना अन्न-पाणी दिल्याने ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य यांचा आशीर्वाद देतात, असे मानले जाते. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जन्म दिला, मोठे केले आणि आपल्यासाठी कष्ट घेतले. त्यांचे हे ऋण फेडण्याचा श्राद्ध हा एक मार्ग आहे. श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
श्राद्धाची पद्धत - श्राद्धाच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात. सर्वप्रथम नदी, तलाव किंवा घरातच पाण्याने पितरांना तर्पण दिले जाते. तांदळाचे पीठ, तीळ आणि मध मिसळून तयार केलेले पिंड पितरांना अर्पण केले जातात. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना आदराने घरी बोलावून त्यांना भोजन दिले जाते. कावळ्यांना यमदूतांचे प्रतीक मानले जाते, म्हणून श्राद्धाचे अन्न त्यांना दिले जाते.
यंदाच्या पितृपक्षात तरी चूक सुधारा! मयत व्यक्तींचे फोटो घरात या दिशेला लावणं शुभ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)