गुरुपुष्यामृत योगाचे धार्मिक महत्त्व - हा योग सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. या दिवशी केलेली कोणतीही सुरुवात, गुंतवणूक किंवा धार्मिक कार्य यशस्वी होते असे मानले जाते. या योगात केलेली कोणतीही खरेदी किंवा गुंतवणूक अक्षय फळ देते, म्हणजेच त्यातून मिळणारे फायदे चिरकाल टिकतात, अशी मान्यता आहे. पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे, या योगात केलेले लक्ष्मी-नारायणाचे पूजन विशेष फलदायी असते. आध्यात्मिक साधकांसाठी हा योग विशेष महत्त्वाचा आहे. मंत्र सिद्धी, तंत्र सिद्धी आणि इतर साधनांसाठी हा दिवस उत्तम मानला जातो.
advertisement
गुरुपुष्यामृत योगात खरेदी - या योगात विशेषतः काही गोष्टींची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते, कारण त्यातून घरात सुख-समृद्धी येते असे म्हटले जाते. सोने-चांदी हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या योगात सोने खरेदी केल्यास घरात धनवृद्धी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी हा योग अत्यंत शुभ मानला जातो. नवीन घर, जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा उत्तम मुहूर्त आहे. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यासाठीही हा योग चांगला मानला जातो. या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात करणे किंवा व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे शुभ फलदायी ठरते.
परंतु, गुरुपुष्यामृत योग अत्यंत शुभ असला तरी या दिवशी विवाह केला जात नाही. गुरुपुष्यामृत योग खरेदीसाठी सर्वात शुभ मानला जातो. येत्या गुरुवारी म्हणजे 18 सप्टेंबर 2025 रोजी गुरुपुष्यामृत योग जुळला आहे. दिवसभर खरेदीसाठी शुभ मुहूर्त मिळत आहे.
यंदाच्या पितृपक्षात तरी चूक सुधारा! मयत व्यक्तींचे फोटो घरात या दिशेला लावणं शुभ
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)