नारळी पौर्णिमेचे महत्त्व - नारळी पौर्णिमा हा सण वरुण देवतेला (समुद्र देवतेला) समर्पित आहे. पावसाळा संपत आल्यानंतर आणि समुद्राचे रौद्र रूप शांत झाल्यावर कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्रात नारळ अर्पण करतात. नारळ हा शुभ आणि मंगल, सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. नारळ अर्पण करून कोळी बांधव वरुण देवतेकडून आपल्या आणि आपल्या बोटींच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात. यानंतर मासेमारीचा नवा हंगाम सुरू होतो. नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजाची संस्कृती आणि त्यांची समुद्राशी असलेली घट्ट नाळ याचे प्रतिबिंब आहे. या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून गाणी आणि नृत्याचा कार्यक्रमही कोकणात अनेक ठिकाणी केला जातो.
advertisement
नारळी पौर्णिमा 2025 - नारळी पौर्णिमा आज 8 ऑगस्ट 2025, शुक्रवारी आहे. आज सौभाग्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असल्याने शुभ मुहूर्त आहे.
नारळी पौर्णिमेला काय करतात - समुद्राची पूजा केली जाते कोळी बांधव आपल्या बोटी सजवून समुद्राची पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात. कोकणात घराघरात नारळी भात आणि नारळाच्या वड्यांसारखे खास गोड पदार्थ बनवले जातात. याच दिवशी रक्षाबंधन असल्याने बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि गोड खाऊ घालते. पण, यंदा रक्षाबंधन नारळी पौर्णिंमेनंतर दुसऱ्या दिवशी आहे. किनारपट्टीच्या भागात लोक एकत्र येऊन गाणी, नृत्य आणि विविध कार्यक्रमांनी हा दिवस उत्साहात साजरा करतात.
जेवणापूर्वी की जेवणानंतर? घरी आलेल्या भावाला कधी राखी बांधणे योग्य ठरेल
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
