TRENDING:

Sankashti Chaturthi 2026: बाप्पा मोरया! मार्च महिन्याची संकष्टी चतुर्थी शुक्रवारी; पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त विधी पाहा

Last Updated:

Sankashti Chaturthi 2026: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. मार्चमध्ये म्हणजेच मराठी फाल्गुन महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदू धर्मात श्री गणेशाला प्रथम पूज्य देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल कार्य विघ्नहर्त्याच्या पूजनाशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. मार्चमध्ये म्हणजेच मराठी फाल्गुन महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मार्च महिन्यातील या संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्रांची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
News18
News18
advertisement

मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी - पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 06 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 07 वाजून 53 मिनिटांनी सुरू होईल. या तिथीची समाप्ती 07 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 07 वाजून 17 मिनिटांनी होईल. संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रोदयाला विशेष महत्त्व असते. 06 मार्च रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 09 वाजून 12 मिनिटे असल्याने या वर्षी मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत 06 मार्च 2026 रोजी साजरे केले जाईल.

advertisement

पूजा विधी - सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती स्थापित करावी. गणपतीला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. बाप्पाला लाल फुले, अक्षता, चंदन आणि शेंदूर अर्पण करावा. गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी. मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवावा. अथर्वशीर्ष किंवा गणेश चालीसा पठण करावे. दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे आणि त्यानंतरच उपवास सोडावा.

advertisement

प्रभावी मंत्र - संकष्टीच्या पूजेच्या वेळी काही विशेष मंत्रांचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतो.

गणेश गायत्री मंत्र: ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्।

कार्य सिद्धी मंत्र: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

मूल मंत्र: ॐ गं गणपतये नमः।

advertisement

कोकणात शिमग्याला येवढं काय-काय करतात? संकासुराची हवा, पालख्यांचा नाच म्हणजे..

श्री गणेशाची आरती -

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळांची || 1 ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मनकामना पुरती || धृ ||

advertisement

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा | चंदनाची उटी कुंकुमकेशरा |

हिरेजडित मुकुट शोभतो बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय देव... || 2 ||

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |

दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना || जय देव... || 3 ||

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

व्रताचे महत्त्व - फाल्गुन महिन्यातील या चतुर्थीचे व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ज्यांच्या कामात वारंवार अडचणी येत आहेत किंवा आर्थिक अडचणी आहेत, त्यांनी हे व्रत श्रद्धेने केल्यास त्यांचे प्रश्न मार्गी लागतात. बाप्पाच्या आशीर्वादाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नैवेद्यासाठी घरी मोदक बनवू शकता किंवा पेढ्यांचा प्रसाद अर्पण करावा.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Sankashti Chaturthi 2026: बाप्पा मोरया! मार्च महिन्याची संकष्टी चतुर्थी शुक्रवारी; पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त विधी पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल