शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव, प्रेम-आकर्षण, भोग-विलासी जीवन इत्यादींचा कारक मानले जाते. सध्या शुक्र मीन राशीत विराजमान आहे.
मेष - सुख-संपत्तीचा कारक असलेला शुक्र ग्रह उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या राशीच्या बाराव्या घरात राहणार आहे. यामुळे मेष राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. अविवाहित लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो. विवाहइच्छुकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. पैशांबाबत काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतले तर तुम्हाला खूप यश मिळू शकेल. तुम्ही परदेशात प्रवास करू शकता किंवा लांब सहलीला जाऊ शकता.
advertisement
मिथुन - शुक्राने शनिच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर, शुक्र या राशीच्या दहाव्या घरात राहणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीवर जन्मलेल्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप फायदे मिळू शकतात. यासोबतच बॉस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमचे काम आवडू शकते. कामाचे कौतुक होऊ शकतो. सहकाऱ्यांसोबतचे तुमचे संबंधही दृढ होतील. तुम्हाला परदेशातून नोकरीची उत्तम संधी मिळू शकते. यासोबतच, तुम्ही कामाच्या निमित्ताने परदेशात प्रवास करू शकता. आयात-निर्यात व्यवसायातही मोठा नफा मिळू शकतो. व्यावसायिक जीवनातही तुम्हाला खूप चांगले फायदे मिळू शकतात. तुमचा कल अध्यात्माकडे जास्त असू शकतो.
नशिबाचा खेळ! या जन्मतारखा असणाऱ्यांची लव्ह मॅरेज होतात; जास्त विरोध नाही होत
कन्या - शुक्र राशीतील बदल या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. पालक आणि मार्गदर्शकांच्या सल्ल्याने तुम्ही अनेक क्षेत्रात प्रचंड यश मिळवू शकता. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. यासोबतच तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.
नवीन वर्षात काहीच ठीक नाही! घरात लावलेल्या कॅलेंडरची दिशा बदलून पहा परिणाम
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)