सहीतील 'मनी बॅग' म्हणजे काय?
स्वाक्षरी ज्योतिष तज्ज्ञ विवेक त्रिपाठी सांगतात की, आपण इंग्रजीत सही करतो, त्यामध्ये 'मनी बॅग' असणं आवश्यक आहे. तुमच्या सहीत 'मनी बॅग' नसेल तर तुम्हाला पैशाची चणचण भासेल. उदाहरणार्थ, तुमचं राजेश हे नाव असेल. राजेश नावाचे दोन लोक आहेत, परंतु त्यांच्या स्वाक्षऱ्या वेगळ्या असतील. कोणाचीही स्वाक्षरी दुसऱ्यासारखी नसेल. तुम्हाला दिसेल की एक राजेश श्रीमंत असू शकतो, तर दुसरा पहिल्यापेक्षा गरीब असू शकतो.
advertisement
विवेक त्रिपाठी यांच्या मते, स्वाक्षरी ज्योतिषशास्त्रात, 'मनी बॅग'ला संपत्तीचा गठ्ठा म्हटले आहे. ज्या व्यक्तीच्या स्वाक्षरीत 'मनी बॅग' असेल तो श्रीमंत असेल. त्याच्याकडे संपत्तीचा खजिना असेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.
'मनी बॅग' कशी तयार होते?
सही करताना कोणत्याही अक्षरात वर्तुळाकार येतो, त्या आकाराला 'मनी बॅग' म्हणतात. उदाहरणार्थ, तुमच्या सहीत Y असेल आणि Y चा खालचा भाग गोल किंवा वर्तुळाकार असेल तर ती 'मनी बॅग' होईल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही R, G, J, S किंवा इतर कोणतेही अक्षर तयार करताना 'मनी बॅग' बनत असेल तर तुम्ही श्रीमंत व्यक्ती असाल. 'मनी बॅग' बनवताना मनी बॅग पूर्णपणे बंद होत असल्याची खात्री करा.
समजा एखाद्याच्या सहीत 'मनी बॅग' नसेल तर काय करावं? यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमची सही करण्याची पद्धत बदलणे. कुठेतरी 'मनी बॅग' तयार होईल अशी सही करावी. सहीत 'मनी बॅग' वापरल्यास त्याचा तुमच्या जीवनावर हळूहळू परिणाम होईल. आर्थिक समस्या कमी होतील आणि तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुमच्या स्वाक्षरीतील 'मनी बॅग'व्यतिरिक्त विचारात घेण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
