ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला तोंड असलेल्या खुर्चीवर बसावे?
ऑफिसमध्ये कामाला बसताना पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसणे शुभ मानले जाते. याशिवाय, ईशान्य दिशेला तोंड करून काम करणे देखील शुभ आहे. या दिशांना तोंड करून बसल्यानं करिअरमध्ये वेगात प्रगती होते, यासोबतच पगारही वाढतो असं वास्तुशास्त्र सांगतं. ऑफिसमध्ये बॉसने पश्चिमेकडे बांधलेल्या केबिनमध्ये बसावे आणि त्याचे तोंड ईशान्य दिशेला असावे. असे केल्याने कंपनी किंवा व्यवसायाची वेगाने वाढ होते.
advertisement
चित्रा नक्षत्रात बुध गोचर! आशा-अपेक्षा सोडलेली असताना या 3 राशींचे भाग्य उजळणार
ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला तोंड करून बसू नये?
ऑफिसमध्ये काम करताना चुकूनही दक्षिण किंवा आग्नेय दिशेला तोंड करून बसू नये. असे म्हटले जाते की यामुळे एकाग्रता बिघडते, ज्यामुळे कामात यश मिळण्यास उशीर होतो.
ऑफिसच्या डेस्कवर कोणती झाडे ठेवावीत? - ऑफिसच्या डेस्कवर बांबू किंवा जेड वनस्पती ठेवणे शुभ मानले जाते. याशिवाय एरिका पाम, मनी प्लांट, ड्रॅकेना वनस्पती देखील ठेवता येते. ऑफिस डेस्कवर ही रोपे ठेवल्याने नशीब साथ देते असे मानले जाते.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं अधोगतीचे कारण, प्रगतीच्या वाटेत विघ्न येतं
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)