दागिने-पैसा - घरात सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवण्यासाठी दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशा सर्वोत्तम आहे. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा स्थिरतेची मानली जाते, त्यामुळे येथे ठेवलेली संपत्ती लवकर खर्च होत नाही उलट त्यात वाढ होत राहते.
पूर्वजांचे फोटो - वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांचे फोटो लावणे अत्यंत शुभ असते. ही दिशा यम आणि पितरांची मानली जाते. या दिशेला फोटो लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील लोकांची प्रगती होते.
advertisement
दुर्मिळ बुधादित्य राजयोग जुळला! या 3 राशींच्या प्रगतीला नाही लागणार लगाम, भाग्याची मोठी साथ
झाडूची जागा - घरातील झाडू नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा. हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला झाडू लपवून ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरात कधीही पैशांचा तुटवडा जाणवत नाही.
जड वस्तू आणि पलंग - घराची दक्षिण दिशा जड वस्तूंसाठी उत्तम मानली जाते. कपाट, तिजोरी किंवा बेड यांसारख्या जड वस्तू या दिशेला असाव्यात. यामुळे घरात चांगले वातावरण राहते, कुटुंबात शांतता राहते. झोपताना डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असावेत, यामुळे वैवाहिक जीवनात मधुरता राहते, आरोग्य सुधारते.
सच्चा दोस्त तोच! या 4 बर्थडेट असणारे लोक अडचणीत पाठीशी उभे राहतात
जेड प्लांट आणि फिनिक्स पक्षी - आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी दक्षिण दिशेला जेड प्लांट ठेवणे फायदेशीर ठरते. तसेच, घराच्या हॉलमध्ये दक्षिण दिशेला फिनिक्स पक्ष्याचा फोटो लावल्याने घरातील लोकांचा कामातील आत्मविश्वास वाढतो, आरोग्य उत्तम राहते, असे मानले जाते.
