यंदाची सफला एकादशी खास ठरणार आहे. वैदिक पंचांगानुसार या दिवशी सोमवार, चित्रा नक्षत्र आणि शोभन योग असा दुर्मीळ आणि शुभ संयोग जुळून येत आहे. हे तीनही योग एकत्र आल्यामुळे या एकादशीचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे. विशेष म्हणजे, या दिवशी भगवान विष्णूंबरोबरच भगवान शंकराची पूजा केल्यास विशेष फलप्राप्ती होते, असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. या शुभ संयोगांचा प्रभाव काही राशींवर विशेष लाभदायक ठरणार असून, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे.
advertisement
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी सफला एकादशी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. या दिवशी केलेली पूजा आणि उपवास तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि मानसिक शांती घेऊन येईल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ लाभदायी ठरेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि नवीन संधींचे दरवाजे खुले होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी ही एकादशी शुभ परिणाम देणारी ठरणार आहे. या काळात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, विशेषतः नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील. मात्र, वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी सफला एकादशीपासून सकारात्मक बदलांची सुरुवात होणार आहे. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता मजबूत होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता असून, तुमच्या नेतृत्वगुणांना योग्य दाद मिळेल.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी सफला एकादशी विशेष दिलासा देणारी ठरेल. आतापर्यंतच्या अडचणी आणि मानसिक ताण कमी होतील. शुभ योगांच्या प्रभावामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
