मक्याची आवक सर्वात कमी
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, 14 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषीमार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 3 क्विंटल इतकी झाली. आज मका पिकाची आवक फक्त बुलढाणा मार्केटमध्ये झाली. बुलढाणा मार्केटमधील 3 क्विंटल पिवळ्या मक्यास प्रतीनुसार 1400 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. शनिवारच्या तुलनेत मक्याच्या दरात घट दिसून येत आहे.
advertisement
शेतीतील अनेक कामं एकाच यंत्रावर, इलेक्ट्रिक पॉवर टिलरची किंमत किती?
कांद्याच्या दरात घसरण
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 25 हजार 761 क्विंटल इतकी झाल्याची नोंद आहे. त्यातील 13 हजार 336 क्विंटल लोकल कांद्याची सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 900 ते 2125 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच पुणे आणि सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या कांद्यास 3000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत कांद्याच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे.
सोयाबीनच्या दरातही घसरण
राज्याच्या मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 2 हजार 957 क्विंटल इतकी झाली. सर्वाधिक आवक ही लातूर मार्केटमध्ये झाली. लातूर मार्केटमधील 2 हजार 355 क्विंटल सोयाबीनला 4001 ते 4611 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 202 क्विंटल सोयाबीनला 4565 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजार भावात घट दिसून येत आहे.





