advertisement

शेतीतील अनेक कामं एकाच यंत्रावर, इलेक्ट्रिक पॉवर टिलरची किंमत किती?

Last Updated:

पुण्यातील मोशी येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनात भारतातील पहिला इलेक्ट्रिक पॉवर टिलर शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे

+
शेतीतील

शेतीतील अनेक कामे करा एका यंत्रावर

प्रतिनिधी: पूजा सत्यवान पाटील पुणे
पुणे: पुण्यातील मोशी येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनात भारतातील पहिला इलेक्ट्रिक पॉवर टिलर शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. Orbit agro tech या कंपनीने विकसित केलेला हा पॉवर टिलर पूर्णपणे इलेक्ट्रिक असून त्यासाठी डिझेलची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे हा पॉवर टिलर सर्व प्रकारच्या पिकांसाठी वापरता येतो.
पॉवर टिलर हा इलेक्ट्रिक असून तो पूर्णपणे बॅटरीवर चालणारा आहे. साधारपणे दोन तास चार्ज केल्यानंतर शेतातील नांगरणी, कोळपणी आणि आंतरमशागत यांसारखी कामे त्याच्या मदतीने करता येतात. पिकं मोठी झाल्यावर किंवा ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जाऊ शकत नाही त्या ठिकाणी यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो.
advertisement
सध्या या टिलरची किंमत सुमारे 1.5 ते 2.5 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे अंदाज आहे, मात्र रक्कम मॉडेल, बॅटरी सेट यांची बदलू शकते.या यंत्रामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
शेतीतील अनेक कामं एकाच यंत्रावर, इलेक्ट्रिक पॉवर टिलरची किंमत किती?
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement