TRENDING:

Most Miser Zodiac Signs: 1 नंबरची कंजूष माणसं या राशींची असतात; तुमच्या राशीचा कितवा क्रमांक लागतोय?

Last Updated:

Most Miser Zodiac Signs: काही राशींचे लोक उदार मनाने खर्च करतात, तर काही नेहमी काळजीपूर्वक विचार करून खर्च करतात. सर्वात जास्त पैसे वाचवतात त्यांना आपण सर्वसाधारणपणे कंजूष म्हटले जाते. परंतु

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पैसा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतोच, पण तो खर्च करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीसाठी वेग-वेगळी असते. काही लोक पाण्यासारखे पैसे खर्च करतात, तर काही प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतात. राशीनुसार लोकांची ही सवय खूप वेगळी असल्याचे दिसून येते. काही राशींचे लोक उदार मनाने खर्च करतात, तर काही नेहमी काळजीपूर्वक विचार करून खर्च करतात. सर्वात जास्त पैसे वाचवतात त्यांना आपण सर्वसाधारणपणे कंजूष म्हटले जाते. परंतु, त्यांच्या दृष्टीने ते स्मार्ट आर्थिक नियोजन असतं. ज्योतिषी रवी पराशर यांच्याकडून जाणून घेऊया, कोणत्या राशीचे लोक सर्वात जास्त कंजूष मानले जातात आणि त्यांची त्यामागची भमिका काय असते.
News18
News18
advertisement

मकर, कन्या आणि वृषभ - पैशाचे मास्टर प्लॅनर

या 3 राशींचे लोक पैशाचे मूल्य चांगले जाणतात, ते विनाकारण खर्च करत नाहीत. त्यांना एखाद्या गोष्टीची गरज असली तरी ते विचार करून, तुलना करून आणि किंमत तपासल्यानंतरच ते खरेदी करतात. लोक त्यांना कंजूष म्हणून अनेकदा चिडवतात, परंतु सत्य असं आहे की, ते पैशाच्या व्यवस्थापनात माहीर असतात. या राशीच्या लोकांकडे नेहमीच आपत्कालीन निधी शिल्लक असतो आणि त्यांना क्वचितच पैसे उधार घ्यावे लागतात.

advertisement

कुंभ, तूळ आणि मिथुन - मनाने खर्च करणारे

या राशीच्या लोकांना प्रत्येक पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे माहीत असतं. खरेदीची योग्य वेळ आणि सवलतींची वाट पाहणं ही त्यांच्यासाठी कॉमन गोष्ट आहे. त्यांना निरुपयोगी गोष्टींवर पैसे वाया घालवणं आवडत नाही, ते फक्त अशा गोष्टींवर खर्च करतात जिथे त्यांना चांगले परतावे मिळतात. या लोकांना ऑफर वैगेरे लवकर समजतात, पैसे वाचवणं हा त्यांच्यासाठी खेळ असतो, ज्यामध्ये ते जिंकतात, फालतू खर्च करत नाहीत, शक्य असेल तिथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात.

advertisement

जन्माष्टमीला या 4 मूलांकाचे नशीब उजळणार; नवी गाडी, पगारवाढ, पैसा येणार

धनु, मीन आणि कर्क - खर्चात भावनिक  

या राशीचे लोक पैशाच्या बाबतीत खूप भावनिक असतात, त्यांना वाटत असेल की त्यांनी एखाद्याला मदत करावी किंवा त्यांना एखाद्या गोष्टीतून आनंद मिळेल, तर ते उदारतेने खर्च करतात. कधीकधी ते हुशारीने खर्च करतात, परंतु बहुतेकदा ते भावनिकतेतून निर्णय घेतात, त्यांना नातेसंबंधांसाठी पैसे खर्च करण्यास, भेटवस्तू देण्यात ते पुढे असतात.

advertisement

मेष, सिंह आणि वृश्चिक - राजेशाही खर्च करणारे

या राशीच्या लोकांची शैली खर्च करणारी असते. त्यांना जे आवडेल ते ते लगेच खरेदी करतील, त्यांना त्याची गरज असो वा नसो. त्यांच्यासाठी खरेदी करणं आनंद मिळवण्याची बाब असते. कदाचित त्यांना थोड्या वेळानं पश्चात्ताप होऊ शकतो. बऱ्याचदा त्यांचा विचार असा असतो, पैसा हा खर्च करण्यासाठीच आहे, मग का खर्च करू नये.

advertisement

शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Most Miser Zodiac Signs: 1 नंबरची कंजूष माणसं या राशींची असतात; तुमच्या राशीचा कितवा क्रमांक लागतोय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल