हरिद्वार : ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार, उत्तर दिशेच्या राशिच्या लोकांना सावधान राहण्याची गरज आहे. उत्तर दिशेच्या राशीत मंगळ राहू यांची युती तयार झाल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता सांगितली जात आहे. सोबत उत्तर भारताची यात्रा करणे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर नाही, असेही सांगितले जात आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि राहू दोन्ही ग्रह अंगार योग तयार करत आहेत. या कारणामुळे उत्तर दिशेच्या राशी असलेल्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिषीनुसार, 1 जून पर्यंत कुठे ट्रिपला जात असाल तर ती ट्रिप रद्द करून द्या.
advertisement
खूप सारा पैसा, प्रत्येक क्षेत्रात प्रगती, जून महिना हा या 3 राशींच्या लोकांसाठी Golden time
हरिद्वार येथील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित शशांक शेखर शर्मा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुम्ही प्रवासाला निघाला असाल तुम्हाला अत्यंत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना सावधान राहणे गरजेचे आहे.
तसेच उत्तर भारतात जर ट्रीप करण्याचा विचार करत असाल तर जून महिन्यापर्यंत थांबा. सध्या चार धामची यात्रा सुरू आहे. चार धामची यात्रा करण्यासाठी भाविक देशातील विविध कोपऱ्यांतून हरिद्वार येथे गंगा-स्नान करत आहेत.
किचनमध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच चुका करताय? तर व्हाल कर्जबाजारी, होईल मोठं नुकसान
काय काळजी घ्याल -
ज्योतिषाचार्य पंडित शशांक शेखर शर्मा यांनी सांगितले की, ‘कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या जातकाला सावधान राहण्याची गरज आहे. मंगल आणि राहुची युती बनल्याने या राशीच्या लोकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मगंळ आणि राहू दोन्ही अंगार योग तयार करत आहेत. अशावेळी घराच्या बाहेर जाणे जातकासाठी लाभदायी नसेल. यात्रा करण्यासाठी घरातून निघाला असाल आणि हरिद्वार किंवा ऋषिकेशमध्ये थांबले असाल तर येथूनच परत यावे. तसेच जर तुम्ही पुढे गेला असाल तर तुम्हाला प्रवासादरम्यान, खूप काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.