किचनमध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच चुका करताय? तर व्हाल कर्जबाजारी, होईल मोठं नुकसान
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
घरात पूजा स्थाननंतर सर्वात पवित्र स्थान हे स्वयंपाकघर असते. मात्र, आज सर्वात स्वयंपाकघराबाबत लोक जागरूक नाहीत आणि वास्तूच्या नियमांना दुर्लक्ष करतात. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होते.
दुर्गेश सिंग राजपूत, प्रतिनिधी
नर्मदापुरम : अनेक जणांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे तुम्ही पाहत असाल. कुणावर बँकेचं कर्ज आहे तर कुणी कुणीतरी व्याज भरून भरून थकून गेला आहे. त्यात तरुणाईचा विचार केला असता अनेक जण इएमआय भरत आहेत. मात्र, तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणींसाठी फक्त भौतिक सुखाच्या इच्छाच नव्हे तर वास्तूदोषही कारणीभूत आहे. बहुतांश जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
advertisement
याबाबत नर्मदापुरम येथील ज्योतिषाचार्य पंडित पंकज पाठक यांनी महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, घरात पूजा स्थाननंतर सर्वात पवित्र स्थान हे स्वयंपाकघर असते. मात्र, आज सर्वात स्वयंपाकघराबाबत लोक जागरूक नाहीत आणि वास्तूच्या नियमांना दुर्लक्ष करतात. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे नेमकी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात.
advertisement
स्वयंपाक घरात या 7 चूका करू नका -
1. स्वयंपाकघरात जोडे-चप्पल घालू नका - पूजा स्थळासोबत स्वयंपाकघर पवित्र मानले जाते. यामुळे याठिकाणी जोडे-चप्पल घालू नये. तसेच स्वयंपाकघराजवळ चप्पल घालण्याची जागा तयार करू नये. कारण स्वयंपाकघरात अग्नी, पाणी, पृथ्वी आणि आकाश असे सर्व घटक आहेत. स्वयंपाकघराशिवाय, पूजागृहापेक्षा पवित्र अशी दुसरी जागा नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
advertisement
2. स्वयंपाकघरात कचऱ्याची बाल्टी ठेऊ नका - स्वयंपाक घरात आपल्याला कोणत्याही प्रकारची अस्वच्छता करू नये. कचरा जमा करू नये. कचऱ्याची बाल्टी ठेऊ नये. कचऱ्याची बाल्टी किचनच्या बाहेर हवी.
3. स्वयंपाकाच्या घराचा रंग - वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कोणता रंग असावा याकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही स्वयंपाकघरात निळा, हिरवा किंवा पांढरा रंग लावला तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे स्वयंपाकघरातील भिंतीला फक्त पिवळा, केशरी किंवा पांढरा रंग द्यावा.
advertisement
4. स्वयंपाकघर जवळ स्नानगृह नसावे : कधीही स्वयंपाकघराला लागून स्नानगृह नसावे. असे केल्याने तुम्ही कर्जबाजारी होऊ शकतात. तुमच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
5. पाण्याचा नळ : स्वयंपाकघरातील नळातून पाणी कधीही टपकू नये याची विशेष काळजी घ्यावी. असे केल्याने तुम्हाला आर्थिक संकंटांचा सामना करावा लागू शकतो.
6. खोटी भांडी ठेवू नका : किचन स्वच्छ ठेवावे. उष्टी भांडी एकत्र जमा करुन ठेऊ नये. असे करणे शुभ आहे. यामुळे आर्थिक संकटांसोबत आयुष्यात नकारात्मकता येते.
advertisement
7. स्वच्छतेची काळजी : स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाकघर स्वच्छ करणे महत्वाचे आहे. असे न केल्यास तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारची संकटं येऊ शकतात.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
advertisement
Location :
Madhya Pradesh
First Published :
May 23, 2024 12:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
किचनमध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच चुका करताय? तर व्हाल कर्जबाजारी, होईल मोठं नुकसान