विजया एकादशी 2026 मुहूर्त - पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी तिथीचा प्रारंभ 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांनी होईल. या तिथीची समाप्ती 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी होणार आहे. एकादशीची पूजा करताना मनात सतत हरीनामाचा जप करत राहावे.
उपवास सोडण्याची वेळ - विजया एकादशीच्या व्रताचे पारण 14 फेब्रुवारी रोजी केले जाईल. पारण करण्याची वेळ सकाळी 7 वाजून 7 मिनिटे ते सकाळी 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत असेल. पारण तिथीच्या दिवशी द्वादशी दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनी संपणार आहे. एकादशीचे पारण द्वादशी संपण्यापूर्वी करणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही.
advertisement
आत्तापासूनच सावधान! फेब्रुवारीच्या मध्यात मंगळ कुंभ राशीत; या राशींवर सलग संकटे
पूजा विधी - विजया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे किंवा नारंगी रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजेच्या जागी गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करून घ्या आणि एका चौरंगावर पिवळे कापड अंथरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्यानंतर तुपाचा दिवा लावून देवाला चंदनाचा टिळा लावावा आणि फुलांचा हार अर्पण करावा. भगवान विष्णूंना पंचामृत, पिवळी मिठाई, गूळ-फुटाणे आणि तुळस अर्पण करावी. नारायण सोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी आणि कथा ऐकून विष्णूंची आरती करावी.
भगवान विष्णूंचे प्रभावी मंत्र -
ॐ नमोः नारायणाय॥
ॐ नमोः भगवते वासुदेवाय॥
ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥
मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुडध्वजः। मङ्गलम् पुण्डरी काक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥
पूर्वमुखी घर का सर्वात शुभ? पण 'वास्तु'चे हे नियम 90% लोक दुर्लक्षित करून चुकतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
