कुत्रा रागात दिसणं -
रागावलेला कुत्रा स्वप्नात दिसणं अशुभ आहे. स्वप्नशास्त्रानुसार, याचा अर्थ असा आहे, की जवळचा मित्र किंवा नातेवाईकाकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो.
पांढरा कुत्रा दिसणं -
पांढरा रंग शांततेचं प्रतीक मानला जातो. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात पांढरा कुत्रा दिसल्यास तुम्हाला अशा कामात खूप यश मिळेल, ज्यातून भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होईल, असा त्याचा अर्थ होतो.
advertisement
कुत्रा पाठलाग करताना दिसणं -
जर तुम्हाला स्वप्नात कुत्रा पाठलाग करताना दिसत असेल तर हा शुभ संकेत आहे. यामुळे भविष्यात चांगली बातमी मिळू शकते. स्वप्नशास्त्रानुसार तुमच्या वैवाहिक जीवनातल्या समस्या लवकरच दूर होणार आहेत, असा त्याचा अर्थ आहे.
सतत पैशांची तंगी जाणवते? घरातील या 5 वाईट वस्तू लगेच काढून टाका...
कुत्रा रडताना दिसणं -
स्वप्नात कुत्रा रडताना दिसल्यास सतर्क व्हा. स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे, की भविष्यात तुम्हाला वाईट बातमी मिळू शकते किंवा तुमचं नुकसान होऊ शकतं.
कुत्रा चावताना दिसणं -
जर तुम्हाला स्वप्नात कुत्रा चावताना दिसला तर ते शुभ मानलं जातं. स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे, की तुमची रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. याशिवाय तुम्ही काही अडचणीत असाल तर त्या दूर होतील.
कुत्रा जवळ येताना दिसणं -
जर तुम्हाला स्वप्नात कुत्रा तुमच्याकडे येताना दिसला असेल तर याचा अर्थ तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. याशिवाय, जर तुमचे तुमच्या मित्रांपैकी कोणाशी काही मतभेद असतील तर ते दूर होऊ शकतात.
उभा पाठीशी दत्तगुरू! श्रीदत्त जयंतीनिमित्त WhatsApp साठी हे सुंदर शुभेच्छा संदेश
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
