या 4 राशींना ठरणार 'लकी'
मेष : सूर्य-मंगळ युती मेष राशीसाठी वरदान ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील, आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल आणि नवीन मालमत्ता खरेदीचे योग आहेत.
सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल.
तूळ : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कौटुंबिक सुख वाढेल आणि परदेशवारीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
advertisement
धनु : तुमच्याच राशीत हा योग होत असल्याने व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतील. व्यवसायात अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
'या' राशींनी राहावे सावध
मिथुन : मानसिक तणाव आणि कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहणे हिताचे ठरेल.
कर्क : आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. खर्चात अचानक वाढ झाल्याने आर्थिक बजेट कोलमडू शकते. गुप्त शत्रूंपासून सावध राहा.
वृषभ : नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद टाळा. घाईघाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात.
मार्गशीर्ष अमावस्येचे धार्मिक महत्त्व
ही वर्षातील शेवटची अमावस्या असल्याने पितरांच्या आत्मशांतीसाठी तर्पण आणि श्राद्ध विधी करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
विशेष 'मंगलादित्य योग'
सूर्य आणि मंगळ हे दोन्ही अग्नी तत्त्वाचे ग्रह असल्याने या युतीमुळे साहस आणि पराक्रम वाढतो. मात्र, ज्यांच्या कुंडलीत हे ग्रह अशुभ स्थानी आहेत, त्यांना रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जाऊ शकते.
नशिबाची साथ मिळवण्यासाठी काय करावे?
अमावस्येच्या दिवशी पिवळ्या वस्तू, अन्न किंवा ब्लँकेट दान करावे. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावावा. यामुळे पितृदोष दूर होतो आणि लक्ष्मीची कृपा राहते.
काय टाळावे?
या दिवशी मांस-मदिरा सेवन करू नये. कोणाशीही वाद घालू नका किंवा घरात भांडण-तंटा करू नका. नवीन मोठ्या कामाची सुरुवात मकर संक्रांतीनंतर करणे अधिक श्रेयस्कर ठरेल. वर्षाची ही शेवटची अमावस्या जुन्या समस्या संपवून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करण्याची संधी घेऊन आली आहे. केवळ सावधगिरी आणि भक्तीच्या जोरावर तुम्ही संकटांवर मात करू शकता.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
