दानधर्म आणि सेवा : खरमास काळात दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. गरजूंना अन्न, वस्त्र, ब्लँकेट किंवा पैसे दान केल्यास अनेक पटींनी पुण्य मिळते. सूर्य, गुरु आणि विष्णूची कृपा प्राप्त होते.
तीर्थयात्रा आणि स्नान : या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि जवळच्या तीर्थस्थळांना भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे पापक्षालन होते आणि मानसिक शांती मिळते.
advertisement
जप आणि तपस्या : हा काळ जप, तपस्या, ध्यान आणि धार्मिक ग्रंथांचे पठण करण्यासाठी सर्वोत्तम आहे. गायत्री मंत्र किंवा इष्ट देवतेच्या मंत्राचा जप केल्यास आध्यात्मिक ऊर्जा वाढते.
सूर्य उपासना : सूर्य धनु राशीत असला तरी, दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे खूप फलदायी ठरते. यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो.
विष्णू आणि कृष्णाची पूजा : खरमास काळात भगवान विष्णू आणि कृष्णाची उपासना केल्यास विशेष लाभ होतो. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप केल्यास सर्व संकटे दूर होतात.
गरीब विद्यार्थ्यांना मदत : या काळात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके दान करणे किंवा त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
