Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात पुन्हा उलथापालथ, मंगळवारी कांदा आणि मक्याला किती मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

16 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये सोमवारच्या तुलनेत शेतमालाची आवक काहीशी कमी झाली. तसेच दरातही घसरण झालेली दिसून येत आहे.

+
Maharashtra

Maharashtra Krushi Market updates 

अमरावती : 16 डिसेंबर, मंगळवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये शेतमालाच्या दरात पुन्हा एकदा घसरण नोंदविण्यात आली आहे. आज बहुतांश बाजारांमध्ये शेतमालाची आवक देखील घटलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे सोयाबीनच्या दरातही आज घसरण झाली आहे. आज राज्याच्या कृषी मार्केटमध्ये सोयाबीन, कांदा आणि मका या तीन महत्त्वाच्या शेतमालांची आवक किती झाली? तसेच शेतकऱ्यांना दर किती मिळाला? हे पाहूयात सविस्तर
मक्याचे सर्वाधिक दर स्थिर
कृषी मार्केटच्या अधिकृत वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी बाजारात मक्याची एकूण आवक 24 हजार 383 क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. आज मक्याची सर्वाधिक आवक नाशिक कृषी बाजारात झाली. नाशिक मार्केटमध्ये दाखल झालेल्या 5 हजार 959 क्विंटल मक्यास 1459 ते 1916 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, मुंबई कृषी बाजारात मक्याला सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. मुंबई बाजारात आलेल्या 691 क्विंटल मक्यास किमान 2500 रुपये तर कमाल 3800 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. सोमवारी जो सर्वाधिक भाव नोंदविला गेला होता, तो आजही स्थिर राहिला आहे.
advertisement
कांद्याचे सर्वाधिक दर स्थिर इतर दरात घसरण
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये कांद्याची एकूण आवक 1 लाख 25 हजार 292 क्विंटल इतकी झाली आहे. यामध्ये सोलापूर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक 26 हजार 105 क्विंटल आवक नोंदविण्यात आली. सोलापूर बाजारात कांद्याला 100 रुपये ते 3500 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तर दुसरीकडे कोल्हापूर कृषी बाजारात आलेल्या 4728 क्विंटल कांद्यास कमाल 4000 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक भाव मिळाला. सोमवारी मिळालेला कांद्याचा उच्चांकी दर आजही कायम राहिला असून, इतर बाजारांमध्ये मात्र दरात घसरण झाल्याचे चित्र आहे.
advertisement
सोयाबीनच्या दरात पुन्हा घट
राज्यातील कृषी मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 55 हजार 551 क्विंटल इतकी झाली आहे. सोयाबीनची सर्वाधिक आवक लातूर कृषी बाजारात झाली असून, लातूर बाजारात दाखल झालेल्या 17 हजार 050 क्विंटल सोयाबीनला 3840 ते 4585 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. वाशिम कृषी बाजारात आलेल्या 3900 क्विंटल सोयाबीनला 5463 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक दर मिळाला. मात्र, सोमवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज सोयाबीनच्या भावात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात पुन्हा उलथापालथ, मंगळवारी कांदा आणि मक्याला किती मिळाला भाव? इथं चेक करा
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement