विवाह समारंभ
खरमास काळात गुरु आणि शुक्र या शुभ ग्रहांची शक्ती कमकुवत होते. विवाह संस्थेसाठी गुरु आणि शुक्राचे बळ आवश्यक असते. या काळात विवाह केल्यास वैवाहिक सुखात कमतरता येते. हिंदू पंचांगानुसार, या काळात कोणतेही शुभ कार्य करू नयेत. या अशुभ कालावधीत कोणतेही शुभ कार्य केल्याने जीवनात अनेक संकटं येतात.
नवीन बांधकाम किंवा गृहप्रवेश
advertisement
या काळात नवीन घरात प्रवेश केल्यास किंवा नवीन बांधकाम सुरू केल्यास घरात अशांती आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. घराला स्थायित्व मिळत नाही. या दरम्यान नवीन बांधकाम सुरु केल्यास वस्तू दोष निर्माण होतात.
नवीन व्यवसाय/नोकरीची सुरुवात
खरमास काळात सूर्य आपली ऊर्जा कमी करतो. त्यामुळे नवीन व्यवसायाची किंवा नोकरीची सुरुवात केल्यास अपेक्षित यश आणि प्रगती मिळत नाही. या काळात नोकरी बदलण्याचा विचार करू नये. या काळात व्यवसाय आणि नोकरीत कोणतेही बदल करण्याचा प्रयत्न करू नका असं केल्यास अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल.
मुंडन/कान टोचणे
मुलांचे मुंडन आणि कान टोचणे हे महत्त्वपूर्ण संस्कार आहेत. हे संस्कार खरमासात केल्यास मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असे मानले जाते की या काळात अशी शुभ काम टाळावीत.
नवीन वस्तू खरेदी
विशेषतः मोठी आणि महागडी वस्तू (उदा. घर, वाहन, सोने) खरेदी करणे टाळावे. यामुळे त्या वस्तूंच्या उपयोगात अडचणी येतात किंवा त्यांचे नुकसान होते. या काळात जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो टाळा नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
यज्ञ आणि मोठे धार्मिक समारंभ
कोणतेही मोठे धार्मिक विधी किंवा यज्ञ या काळात करू नयेत. मात्र, नित्य पूजा, जप, तपस्या आणि गरजूंना दान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. खरमास हा काळ स्वतःला आध्यात्मिकरित्या मजबूत करण्यासाठी आणि देवाचे नामस्मरण करण्यासाठी उत्तम आहे. या काळात शुभ कार्ये टाळून पुढील शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा करावी.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
