गंगाजल हरिद्वारमधून का नेले जाते?
हरिद्वार हे गंगा नदीच्या उगमस्थानाच्या तुलनेने जवळ आहे. त्यामुळे हरिद्वारमध्ये गंगेचे पाणी अधिक शुद्ध, निर्मळ आणि अपवित्रतेपासून मुक्त मानले जाते. त्याच प्रमाणे इथल्या पाण्याची स्थिती बरेच लोक शुद्ध मानतात ज्यामुळे गंगाजल घेऊन जाण्यासाठी हरिद्वार हे योग्य ठिकाण मानले जाते. हरिद्वारमध्ये गंगा नदी पर्वतांतून मैदानी प्रदेशात प्रवेश करते. येथील पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान आणि थंड असतो, ज्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या स्वच्छ राहते. पण हे झालं भौगोलिक कारण. या मागे आणखी काही कारणं देखील आहेत.
advertisement
पौराणिक कथेनुसार हरिद्वारचे महत्व
हरिद्वार हे 'हरिचे द्वार' मानले जाते आणि हे ठिकाण प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. येथेच देव, दानव आणि मानवांनी एकत्र येऊन अमृत प्राशन केले होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे येथील जल अधिक पवित्र मानले जाते. वैज्ञानिक दृष्ट्याही, हरिद्वार आणि त्याच्या वरच्या भागात गंगेच्या पाण्यात गंधकाचे प्रमाण आणि विशिष्ट खनिजे अधिक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या जास्त काळ शुद्ध राहते. अनेक भाविक हरिद्वार, गंगोत्री किंवा गोमुख येथूनच गंगाजल आणतात. या परंपरेमुळे हरिद्वारहून गंगाजल आणण्याची प्रथा अधिक प्रचलित झाली.
काशीमधून गंगाजल का घेऊन जावू नये?
अनेकांचा असा विश्वास आहे की गंगाजल काशी मधून घेऊन जाऊ नये. महादेवाची नगरी 'काशी' ही मोक्ष (मुक्ती) करीता प्रसिद्ध आहे. असं मानलं जात की इथे काशीमध्ये मृत्यू झाला तर मोक्ष नक्की मिळते. काशीमध्ये असलेल्या गंगेत मृत्य व्यक्तींची राख वाहिली जाते. असं मानलं जात की काशीमध्ये कोणताही जीवजंतू, व्यक्ती जर त्याचे प्राण त्यागतो तर त्याला जीवन आणि मृत्यू या चक्रातून मुक्ती मिळते. आणि काशी जवळ असलेल्या गंगेत मृत व्यक्तींची राख मिसळली जाते म्हणून इथलं पाणी (गंगाजल) घरी घेऊन जावू असे मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
