मक्याची आवक कमी; दरात वाढ
आज राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 18 हजार 430 क्विंटल इतकी झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 3 हजार 550 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1300 ते जास्तीत जास्त 1951 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या मक्यास सर्वसाधारण 2600 ते 2800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत मक्याची आवक कमी झाली असून भावात वाढ झाली आहे.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रात आता बर्फासारखी थंडी पडणार, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
कांद्याला किती मिळाला आज भाव?
राज्याच्या मार्केटमध्ये 50 हजार 564 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 24 हजार 696 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 342 ते 1560 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 1575 क्विंटल पोळ कांद्यास प्रतीनुसार 400 ते 4051 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत कांद्याची आवक कमी झाली असून भावात वाढ झाली आहे.
जालन्यात सोयाबीनला सर्वाधिक भाव
राज्याच्या मार्केटमध्ये 28 हजार 611 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. जालना मार्केटमध्ये 5 हजार 405 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 4850 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या सोयाबीनला 4850 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत सोयाबीनची आवक वाढली असून भावात घट झाली आहे.





