नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा -
नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा करण्यापूर्वी घटस्थापनेचा विधी करा. कलश प्रतिष्ठापनेनंतर देवीच्या समोर तुपाचा दिवा लावून फुले अर्पण करा. देवीला बर्फी, खीर आणि रबडी इ. अर्पण करा. देवीचे मंत्र जप करा. शेवटी, शैलपुत्री मातेची आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा.
नवरात्रीचा पहिला दिवस - नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी हा रंग परिधान केल्यानं देवी शैलपुत्रीचे आशीर्वाद मिळतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीला बर्फी, खीर आणि रबडीसारखे पांढरे नैवेद्य अर्पण करा.
advertisement
देवी शैलपुत्रीची आरती -
शैलपुत्री मां बैल असवार। करें देवता जय जयकार।
शिव शंकर की प्रिय भवानी। तेरी महिमा किसी ने ना जानी।
पार्वती तू उमा कहलावे। जो तुझे सिमरे सो सुख पावे।
ऋद्धि-सिद्धि परवान करे तू। दया करे धनवान करे तू।
सोमवार को शिव संग प्यारी। आरती तेरी जिसने उतारी।
उसकी सगरी आस पुजा दो। सगरे दुख तकलीफ मिला दो।
घी का सुंदर दीप जला के। गोला गरी का भोग लगा के।
श्रद्धा भाव से मंत्र गाएं। प्रेम सहित फिर शीश झुकाएं।
जय गिरिराज किशोरी अंबे। शिव मुख चंद्र चकोरी अंबे।
मनोकामना पूर्ण कर दो। भक्त सदा सुख संपत्ति भर दो।
दसऱ्यापासून या 5 राशींचा गोल्डन टाईम येणार; करिअर-व्यवसायात मोठी उसळी, सुख
शैलपुत्री देवीची कथा -
पूर्वजन्मात देवी शैलपुत्री सती या नावाने ओळखली जात होती. त्या दक्ष प्रजापतींची कन्या होत्या. सतीचे लग्न भगवान शिवाशी झाले होते. एकदा दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. त्यांनी आपल्या यज्ञात सर्व देवदेवतांना आमंत्रण दिले, पण जावई असलेल्या भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही. सतीला जेव्हा याबद्दल समजले, तेव्हा तिला खूप दुःख झाले. तिने आपल्या पित्याच्या घरी न बोलावता जाण्याचा निर्णय घेतला. भगवान शिवाने तिला न जाण्याचा सल्ला दिला, पण सतीने ऐकले नाही. ती यज्ञात पोहोचली, पण तिथे तिचा आणि भगवान शिवाचा अपमान झाला. दक्ष प्रजापतीने शिवाचा अपमान केला, ज्यामुळे सतीला असह्य वेदना झाल्या. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने त्याच यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले. तिच्या आत्मयज्ञामुळे भगवान शिव खूप क्रोधित झाले. त्यांनी आपला गण, वीरभद्र, याला दक्ष प्रजापतीचा यज्ञ नष्ट करण्यासाठी पाठवले आणि नंतर सतीचा मृतदेह घेऊन तांडव नृत्य केले.
देवी शैलपुत्री मंत्र -
1. “ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥”
2. “वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥”
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं चंचलतेचं कारण? प्रगती साधतात पण...
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)