मेष रास – मेष राशीच्या लोकांनी शैलपुत्री रुपाची पूजा करावी. देवीला लाल फुलं आणि लाल वस्त्र अर्पण करावं. मनोभावे पूजा करून गूळ-हरभरा डाळ गोर-गरीबांना वाटावे.
वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांना ब्रह्मचारिणी रुपातील देवीची पूजा करणं अधिक शुभ फळदायी ठरेल. पूजा केल्यानंतर देवीला दही-साखर अर्पण करावी, दुग्धजन्य पदार्थांचे दान करावे.
advertisement
मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांनी दुर्गेच्या चंद्रघंटा रुपाची पूजा करावी. या रुपाची पूजा मिथुन राशीसाठी लकी मानली जाते. पूजेनंतर देवीला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा. मंदिरात गेल्यावर घंटानाद अवश्य करावा.
कर्क रास – कर्क राशीच्या लोकांनी दुर्गेच्या कुष्मांडा रुपाची पूजा करावी. पूजेत देवीला मध, नारळ, भोपळा अर्पण करा. पितरांना अन्नदान करावे.
सिंह रास – सिंह राशीच्या लोकांनी यंदाच्या नवरात्रीत देवीच्या स्कंदमाता रुपाची पूजा करावी. याचा फायदा तुम्हाला लगेच दिसेल. पूजेनंतर देवीला लाल वस्त्र आणि सफरचंद अर्पण करावे. पूजनानंतर लहान मुलांना मिठाई वाटा.
कन्या रास – कन्या राशीच्या लोकांनी दुर्गा देवीच्या कात्यायनी रुपाची पूजा करावी. देवीला सुगंधी फुलं, पिवळे वस्त्र अर्पण करा.
सुहासिनींना हळद-कुंकू द्यावे.
तूळ रास – तूळ राशीच्या लोकांनी दुर्गा देवीच्या कालरात्री रुपाची पूजा करावी. देवीला काळ्या वस्त्रात घालून तीळ व तेल अर्पण करा.
शनी मंदिरात दिवा लावणं शुभ ठरेल.
वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांनी देवी दुर्गेच्या महागौरी रुपाची पूजा करावी. देवीला पांढरी फुले, दुधी भोपळा अर्पण करावा. पूजा झाल्यानंतर शक्य असल्यास गरिबांना तांदूळ-दूध द्यावे.
धनु रास – धनु राशीच्या लोकांनी नवरात्रामध्ये दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रुपाची पूजा करावी. पूजा केल्यानंतर देवीला पिवळा प्रसाद (बेसन लाडू) अर्पण करावा. ब्राह्मण किंवा साधूंना भोजन द्यावे.
दसऱ्यापासून या 5 राशींचा गोल्डन टाईम येणार; करिअर-व्यवसायात मोठी उसळी, सुख
मकर रास – मकर राशीच्या लोकांनी देवी दुर्गेच्या शैलपुत्री रुपाची पूजा करावी. याचा मकरेच्या लोकांना लगेच लाभ होईल.
देवीला दुर्वा, बेल अर्पण करा. शिवलिंगावर जल व दुग्धाभिषेक करावा.
कुंभ रास – कुंभ राशीच्या लोकांनी देवी दुर्गेच्या कुष्मांडा रुपाची पूजा करणं लाभदायी ठरेल. पूजा झाल्यानंतर देवीला मध, गूळ व फळं अर्पण करा. पक्ष्यांना धान्य अर्पण करावे.
मीन रास - मीन राशीच्या लोकांनी देवी दुर्गेच्या महागौरी रुपाची पूजा करावी. मीन राशीच्या लोकांनी देवीला पांढरी वस्त्रे आणि शंख अर्पण करावा. विशेषत: अनाथ मुलांना अन्नदान करावे.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं चंचलतेचं कारण? प्रगती साधतात पण...
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)