कार खरेदी करणारी व्यक्ती आपल्या कारमध्ये स्मार्ट ड्रायव्हिंग फीचर्स आणि रोडसाईड असिस्टन्ससारख्या फीचर्सची मागणी करतात. ही हायटेक फीचर्स कार चालवताना ड्रायव्हरची हेरगिरी करतात आणि ही माहिती विमा कंपन्यांना जास्त किमतीत विकतात. या माहितीच्या आधारे, विमा कंपनी कार मालकाच्या ड्रायव्हिंग तपशीलांचं मूल्यांकन करते आणि नंतर वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळे वैयक्तिक प्रीमिअम तयार करते.
advertisement
या बाबत अमेरिकन रिसर्च फर्म लेक्सिसनेक्सिसने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये फर्मने असा दावा केला आहे की, हे स्मार्ट फीचर्स ड्रायव्हरचं कौशल्य, वेग, ड्रायव्हिंगचा धोका यासह इतर अनेक प्रकारची माहिती गोळा करतात. ही माहिती विमा कंपन्यांना विकतात. या माहितीच्या आधारे विमा कंपन्या कार मालकांना फोन करून विविध प्रकारच्या विमा योजना ऑफर करतात.
लेक्सिसनेक्सिस फर्मच्या अहवालानुसार, अमेरिकेतील अनेक कार कंपन्यांनी आपल्या युजर्सचा डेटा चोरला आहे आणि तो विमा कंपन्यांशी शेअर केला आहे. डेटा चोरणाऱ्या कंपन्यांमध्ये जनरल मोटर्स, किया, सुबारू आणि मित्सुबिशी या कंपन्यांचा समावेश आहे. विमा कंपनी थेट ऑटो कंपन्यांकडून डेटा खरेदी करत नाहीत. यासाठी त्या थर्ड पार्टीचा वापर करतात. जेणेकरून कायद्याच्या कक्षेत न येता त्यांना आपलं काम पूर्ण करता येईल.
कारमधील कोणती फीचर्स डेटा चोरू शकतात?
आजकाल बहुतांशॉ गाड्यांमध्ये नेव्हिगेशन, रोडसाईड असिस्टन्स आणि फाईंड माय कार सारखी फीचर्स मिळतात. ही ॲप्स ड्रायव्हरकडून वैयक्तिक डेटा मागतात. अनेक ड्रायव्हर्स अजाणतेपणी अशा फीचर्सना एनेबल करतात परिणामी कार कंपन्या ग्राहकांचा डेटा सेव्ह करतात. ड्रायव्हर्सच्या हे लक्षात येत नाही की, ही फीचर्स वापरल्यानंतर कार कंपन्या ड्रायव्हिंगशी संबंधित वैयक्तिक माहिती ब्रोकरला देतात. या माहितीमध्ये ड्रायव्हरची संपूर्ण ड्रायव्हिंग हिस्ट्री असते. ऑटोमेकर्स आणि डेटा ब्रोकर्सनी अमेरिकन ड्रायव्हर्सबद्दल माहिती गोळा करण्यासाठी एकमेकांशी हातमिळवणी केलेली आहे.
जर तुमच्याकडे स्मार्ट फीचर्स असलेली कार असेल तर तुम्ही या फीचर्सचा वापर करताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. या ॲपवर आधारित फीचर्सना सर्व प्रकारच्या परवानग्या देऊ नये. तसेच, तुम्ही तुमचे वैयक्तिक तपशील आणि त्यासंबंधित इतर माहितीचा वेळोवेळी रिव्ह्यु घेतला पाहिजे.
