TRENDING:

Bike Jugad : बाईकचं पेट्रोल संपलं? 'हे' 3 जुगाड पेट्रोल पंपापर्यंत पोहोचायला करतील मदत

Last Updated:

पेट्रोल संपला की गाडी रस्त्यावर ढकलत नेण्याशिवाय पर्याय नसतो… पण आता नाही. आम्ही तुम्हाला अशा 3 ट्रीक किंवा जुगाड सांगणार आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्यापैकी अनेकजण बाईकवर प्रवास करतो. कामावर जायचं असो, बाजारात, कॉलेजला किंवा लांबच्या प्रवासाला. अशावेळी बाईक महत्वाचं वाहन आहे. ते कामाच्या वेळी नेहमीच आपल्या मदतीला येते. पण असं अनेकदा होतं की घाईगडबडीत आपण आपण पेट्रोल भरायला विसरतो आणि मग अशावेळी कुठे वेळेवर पोहोचता येत नाही. तसेच कधीकधी रस्त्यात मध्येच अडकायला होतं. काही वेळा तर जवळपास पेट्रोलपंप नसल्यामुळे तर खुपच मोठी पंचायत होते.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अशा वेळी ती गाडी रस्त्यावर ढकलत नेण्याशिवाय पर्याय नसतो… पण आता नाही. आम्ही तुम्हाला अशा 3 ट्रीक किंवा जुगाड सांगणार आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. यामुळे बाईक धक्का न देता जवळच्या पेट्रोल पंपापर्यंत सहज नेऊ शकता.

1. चोकचा स्मार्ट वापर करा

तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल संपल्याची शक्यता असेल आणि ती स्टार्ट होत नसेल, तर सर्वप्रथम चोक (choke) वापरून पाहा. काही बाइक्समध्ये चोक ऑन केल्यावर टाकीच्या तळाशी जमा थोडं फार पेट्रोल इंजिनपर्यंत पोहोचतं आणि बाईक काही वेळासाठी स्टार्ट होते. ही वेळ साधून पटकन पेट्रोल पंप गाठा. मात्र लक्षात ठेवा, सर्व बाइकमध्ये चोक सिस्टम नसतो.

advertisement

2. फ्युएल टाकीत प्रेशर तयार करा

जर चोकचा उपयोग होत नसेल, तर बाईकच्या पेट्रोल टाकीमध्ये थोडा प्रेशर तयार करण्याचा हा देसी उपाय आहे. टाकीचा टॅप किंवा झाकण थोडं उघडा आणि सावधपणे त्यात फुंकर मारा. यामुळे टाकीत थोडं प्रेशर तयार होऊन उरलेलं पेट्रोल खाली जाण्याची शक्यता असते. फक्त लक्षात ठेवा की असं करताना धुळमाती आत जाऊ देऊ नका.

advertisement

3. बाईक एका बाजूला झुकवा

जेव्हा पेट्रोल अगदी कमी शिल्लक असतं, तेव्हा ते टाकीच्या एका कोपऱ्यात अडकून राहतं आणि इंजिनपर्यंत पोहोचत नाही. अशा वेळी बाईक साइड स्टँडवर लावा आणि ती थोडा वेळ झुकवून ठेवा. यामुळे उरलेलं पेट्रोल कार्ब्युरेटरपर्यंत पोहोचून बाईक पुन्हा स्टार्ट होऊ शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

या जुगाडांच्या जोरावर तुम्ही एकदा संकटातून नक्की वाचू शकता, पण नेहमी हे काम करेल किंवा फायदेशीर ठरेलच असं नाही. त्यामुळे नेहमी बाईक घेण्याआधी फ्युएल लेव्हल तपासा. तसेच, आपल्या मोबाईलमध्ये जवळच्या पेट्रोल पंपाचं लोकेशन सेव करून ठेवा, म्हणजे अडचणीच्या वेळी लगेच मदत मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Bike Jugad : बाईकचं पेट्रोल संपलं? 'हे' 3 जुगाड पेट्रोल पंपापर्यंत पोहोचायला करतील मदत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल