काँग्रेसचे खासदार वम्सी गड्डम हे तेलंगणामधील atumvader नावाच्या ईलेक्ट्रिक बाइक निर्माता कंपनीचे संस्थापक आहे. त्यांनी तयार केलेल्या Atum या ईलेक्ट्रिक बाइकवर त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये एंट्री केली. या बाइकवर त्यांनी RG असं नाव लिहिलं होतं. साहजिक RG म्हणजे, राहुल गांधी यांचं नाव होतं. काँग्रेसचे खासदार वम्सी गड्डम हे राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक आहे. 'मी राहुल गांधींचा मोठा समर्थक आहे. मी त्यांना नेहमी फॉलो करतो. मी काँग्रेसचा एक भाग आहे आणि आम्ही देशातील लोकांसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. दिल्लीत प्रदुषण प्रचंड वाढलं आहे, त्यामुळे या बाइकवर एंट्री केली' असं गड्डम यांनी सांगितलं.
advertisement
20 रुपये खर्चात 100 किमी!
दोन वर्षांपूर्वी तेलंगणा इथं तयार झालेली Atumvader मार्केटमध्ये लाँच झाली. ही एक ईलेक्ट्रिक बाईक आहे. या बाइकची किंमत 99,999 रुपये इतकी ठेवण्यात आली. ही एक वजनाने हलकी आणि दमदार मोटरसह येते. या बाइकमध्ये 2.4 kWh चा बॅटरी पॅक दिला आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर ही बाइक 100 किमी धावते असा दावा कंपनीने केला आहे. या बाइकचा टॉप स्पीड हा 65 किमी प्रतितास इतका आहे.
Atumobile कंपनी ने या बाइकमध्ये ट्युबलर चेसिस दिली आहे. या बाइकमध्ये 14 लीटर इतका बूट स्पेस आहे. या बाइकची डिझाइन एक क्लासिक आहे. यामध्ये गोल हेडलाईट आणि समोर एलईडी इंडिकेटर्स आणि टेललॅम्प दिले आहे.
ही बाइक इतरांपेक्षा वेगळी कशी?
काँग्रेसचे खासदार वम्सी गड्डम यांनी सांगितलं की, 'आज आपण पाहतोय की हवेची पातळी खालावली आहे. त्यामुळे स्वच्छ आणि ताजी हवा मिळणं कठीण झालं आहे. चांगली हवा मिळावी हा सगळ्यांचा हक्क आहे. त्यामुळे आपल्या पिढीला चांगली हवा मिळावी, याचा संदेश देण्यासाठी ही बाइक तयार केली आहे. ही बाइक एक इको-फ्रेंडली इलेक्ट्रिक मोटरवर चालणारी बाइक आहे. ही बाइक मी स्वतः बनवली आहे. या बाइकवर आमच्याकडे जवळपास १० पेटंट्स आहेत.' असं गड्डम यांनी सांगितलं.
