बाहेर पार्क केलेल्या गाड्यांवर चिंगाऱ्या पडतात आणि पेंटवर काळे, जळालेले डाग दिसू लागतात. मग वाटतं की आता पेंटिंग करावं लागेल आणि खर्च हजारोंमध्ये जाईल. पण काळजी करू नका. काही सोप्या पायऱ्यांनी तुम्ही हे नुकसान स्वतःच कमी खर्चात दुरुस्त करू शकता.
पेंट खरंच खराब झालंय का?
बहुतांश वेळा फटाक्यांच्या ठिणग्या फक्त पेंटच्या वरच्या थरालाच (ज्याला क्लिअर कोट म्हणतात) नुकसान करतात. काही वेळा मात्र थोडे खोल डाग दिसतात. जर डाग फक्त धुळीसारखे दिसत असतील, तर नुकसान किरकोळ आहे. पण जर खाली धातू किंवा प्रायमर दिसू लागला असेल, तर ते नुकसान खोल आहे आणि थोडं जास्त काम लागणार आहे.
advertisement
छोट्या नुकसानासाठी उपाय (The Simple Fix)
जर डाग अगदी हलके असतील, तर सर्वप्रथम त्या भागाला नीट धुवा आणि कोरडं करा.
यानंतर ₹100 ते ₹300 मध्ये मिळणारं रबिंग कंपाउंड किंवा कार पॉलिश घ्या.
मायक्रोफायबर कपड्यावर थोडं कंपाउंड लावून, त्या डागावर गोल गोल फिरवत हळूवार रगडा.
काही मिनिटांतच पेंटची जळालेली परत निघून जाईल आणि गाडीचा रंग पुन्हा झळकू लागेल.
शेवटी त्या जागेवर थोडा कार वॅक्स लावा, म्हणजे पेंटला पुन्हा संरक्षण मिळेल.
खोल डागांसाठी उपाय (The Touch-Up Trick)
जर पेंट पूर्णपणे निघून खालील थर दिसत असेल, तर टच-अप पेंट किट घ्या.
हे तुमच्या गाडीच्या रंगाशी जुळणारं असावं. (रंग कोड किंवा VIN नंबर वापरून मिळवता येईल.)
भाग स्वच्छ करा आणि कोरडा ठेवा.
किटमध्ये असलेल्या ब्रशने जळालेल्या भागावर पेंटची पातळ परत लावा.
वाळल्यावर गरज असेल तर दुसऱ्यांदा रंगाचा हात मारा
शेवटी क्लिअर कोट लावा आणि एक दिवसाने हलकं पॉलिश करा.
मोठ्या नुकसानासाठी उपाय (The DIY Repair)
जर नुकसान खोलपर्यंत गेलं असेल, तर थोडं जास्त काम करावं लागेल.
2000 ग्रिटचं वेट सॅंडपेपर, ऑटोमोटिव्ह प्रायमर, आणि स्प्रे पेंट घ्या.
त्या भागावर सॅंडपेपरने हलकं रगडा, म्हणजे पृष्ठभाग गुळगुळीत होईल.
एक पातळ प्रायमरचा थर लावा आणि वाळू द्या.
नंतर 2–3 पातळ बेस कोटचे थर लावा.
शेवटी क्लिअर कोट लावा आणि वाळल्यावर हलकं पॉलिश करा.
लक्षात ठेवा
हे सर्व काम सावलीत करा आणि घाई करू नका. योग्य साहित्य, थोडं संयम आणि काळजी घेतली, तर तुम्ही तुमच्या कारचा पेंट पुन्हा नव्यासारखा बनवू शकता तेही कमी खर्चात आणि घरीच.